Adani Power Plant esakal
सातारा

Adani Power Plant : तब्बल 'इतक्या' गावांचा विरोध डावलून अदानी प्रोजेक्टचं काम सुरू; नागरिकांतून तीव्र संताप

यशवंतदत्त बेंद्रे

सध्या हा विषय केंद्र शासनस्तरावर प्रलंबित असताना अदानी कंपनीकडून टेस्टिंग आणि खोदकाम चालू केले आहे.

तारळे : कळंबे (ता. पाटण) येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला (Adani Green Energy Project) तारळे विभागातील (Tarle Division) १०२ गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे; परंतु स्थानिकांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने नागरिकांमधून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त केला जात आहे. हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी तारळी अदानी प्रकल्पविरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

निवदेनात म्हटले आहे, की तारळी धरणावर उभारण्यात येत असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट या वीजनिर्मिती प्रकल्पाला (Power Generation Project) संपूर्ण तारळे विभागातील लोकांचा विरोध आहे. विभागातील गावांनी तसे ठरावही केले आहेत. याबाबत कळंबे येथे एमपीसीबी आणि प्रशासनाच्या वतीने यासंदर्भात घेण्यात आलेल्या सुनावणीत एक हजारपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या होत्या.

सध्या हा विषय केंद्र शासनस्तरावर प्रलंबित असताना अदानी कंपनीकडून टेस्टिंग आणि खोदकाम चालू केले आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन तारळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तारळी पंप स्टोअरेज हायड्रो प्रोजेक्टवर अदानी कंपनीने सुरू केलेले काम त्वरित थांबवावे. स्थानिक लोकांच्या भावना तीव्र आहेत, म्हणून प्रशासनाकडून सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय याठिकाणी कोणतेही काम करू नये. सध्या सुरू असलेले काम तातडीने थांबवावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Adani Power Plant

पाटण तालुका प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव, उंब्रज पोलिसांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी देवराज पाटील, बाळासाहेब सपकाळ, अभिजित जाधव, इंद्रजित पाटील, जोतिराम जाधव, हंबीरराव गोडसे, काशिनाथ भंडारे, नानासाहेब पन्हाळकर, बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, भास्करराव गोरे, सचिन लवंगे, सदाशिव सपकाळ, सूरज गोरे, मारुती पवार, विजय यादव, अनिल कांबळे, गणेश जाधव, विश्वनाथ पवार, महिपतराव जाधव आदींसह तारळे खोऱ्यातील गावातील कृती समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT