Pratapgad Sugar Factory Election esakal
सातारा

प्रतापगड कारखान्यावर सौरभ शिंदेंचं वर्चस्व; 21 जागांवर विजयी आघाडी

महेश बारटक्के

आज सकाळपासून सभासद मतदारांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती.

कुडाळ (सातारा) : जावली तालुक्यातील एकमेव औद्योगिक प्रकल्प असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Pratapgad Sugar Factory Election) आज झालेल्या मतमोजणीत सौरभ शिंदे (Saurabh Shinde) गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजयाची आघाडी घेतली असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली असून यात 18 पैकी 12 निकाल जाहीर झाले आहेत. या सर्व जागांवर संस्थापक पॅनेलचे उमेदवार अंदाजे 1200 मताधिक्यानं विजयी झाले आहेत. तर, उर्वरित निकालही थोड्याच वेळात लागणार आहे.

दि. १४ रोजी मतदान प्रकिया शांततेत पार पडली होती. त्यामध्ये ३२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता व सरासरी ५२ टक्के इतके प्रत्यक्ष मतदान झाले होते. जावळी व महाबळेश्वर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या प्रतापगड कारखान्याचे एकूण ६१५६ सभासद संख्या असून यापैकी ३२१५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली होती. त्यापैकी सौरभ शिंदे यांच्या तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनल व दीपक पवार (Deepak Pawar) यांच्या कारखाना बचाव पॅनलमध्ये या निवडणुकीसाठी चुरशीची दुरंगी लढत झाली होती.

आज सकाळपासून सभासद मतदारांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती. आठ दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आज सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले. तालुक्यातील राजकीय वातावरण यानिमित्तानं ढवळून निघाले होते. ही मतमोजणी झाल्यानंतर मतदारांनी आपला कौल सौरभ शिंदे यांच्या बाजूनं दिला, हे सिध्द झालंय. या निकालाकडं संपूर्ण जावळी तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जसजसे निकाल जाहीर होत गेले, तसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत 21-0 सौरभबाबा हिरो, संस्थापक पॅनेलचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत जल्लोष केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT