सातारा

वाळूचा ट्रक कारवाई न करता कोणी सोडला? : सेनेच्या भोसलेंचा प्रशासनाला सवाल

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : अवैधपणे वाळू वाहतूक करताना पकडलेला ट्रक कोणतीच कारवाई न करता कोणी सोडला, असा प्रश्न करतानाच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी ठोस पुरावे चौकशी समितीसमोर देण्याचे लेखी कळवून देखील छावण्यातील भ्रष्टाचार प्रश्नी जिल्हाधिकार्‍यांचे मौन कधी सुटणार?, असाही प्रश्न उपस्थित केला.

दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय भोसले म्हणाले, माणच्या उपविभागीय अधिकारी यांचे पथकाने 23 मे 2020 रोजी अवैधपणे पाच ब्रास वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम.एच-11-ए एल-5328 हा राणंद-मार्डी रस्त्यावरती जाशी फाटा येथे पकडला. त्याचा पंचनामा, जबाब आणि मंडलाधिकार्‍यांच्या रिपोर्टनुसार, तो तहसिल कार्यालयासमोरील मैदानात जमा केल्याची लेखी कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र, सदर वाहन घडलेल्या घटनेपासून पाच-सहा दिवसानंतर सदर जागेवरती आजपर्यंत दिसून आले नाही. सदर प्रकरणात प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तसेच तहसीलदार बाई माने यांनी गेली चार महिने गुन्हाच नोंदविलेला नाही. त्या ट्रकवरती कोणतीच कायदेशीर कारवाई झालेली नसताना तहसिलदार यांचे कस्टडीतील वाहन गायब झाले कसे? वाहन सोडण्यास कोणी मदत केली? हा मोठा प्रश्न आहे. 

या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असून अशा प्रकारांच्या बोलविता धनी समोर आणून अशा प्रकारांना कायमचा आळा बसवावा. यासंबंधी अधिकार्‍यांचे फोन काॅल्स तपासण्यात यावेत, अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे मेलद्वारे केल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. तसेच वाळू चोरी व छावण्यातील भ्रष्टाचार प्रकरणी अनेकदा तपासणी समितीला सबळ पुरावे देण्याचे सांगून सुध्दा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंबंधी कोणतीच कारवाई झालेली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांचे मौन कधी सुटणार, असा प्रश्नही संजय भोसले यांनी उपस्थित केला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT