Nitin Gadkari sakal
सातारा

देशातील प्रत्येकाला घर देण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न : गडकरी

चरेगावकर यांनी सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पुर्ण करण्याचे काम केले

हेमंत पवार-सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः मी सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे देण्याचा प्रयत्न मी केला. मात्र मला ते जमलं नाही, ते काम शेखर चरेगावकर यांनी करुन दाखवले आहे. पाच -सहा लाखांत सर्वसामान्यांना त्यांनी घरे देवुन प्रधानमंत्री आवास योजनेचीही जोड दिली आहे. असे प्रकल्प देशातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात तयार करुन लोकांचे जीवन सस्टीनेबल करता येईल. त्यासाठी हा प्रकल्प रोलमॉडेल ठरले, असे गौरवोदगार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विंग येथील श्रीकृष्ण व्हॅलीमधील सहा लाखांमध्ये घर या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ६० घरांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच घरांच्या चाव्या केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते श्रीकांत कांबळे, संजय पाटील, रामेश्वर रोडे, व्यंकटेश वाघमारे व भगवान वरेकर या घरमालकांना प्रदान करण्यात आल्या. तत्पुर्वी ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सर्व सोयींनी युक्त जागा व उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी श्रीकृष्ण व्हॅली या प्रकल्पात व्यावसायिक जागा असणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर गडकरी बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, कऱ्हाड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, शौकन (विठ्ठल) चरेगावकर यांच्यासह शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, चरेगावकर यांनी सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पुर्ण करण्याचे काम केले आहे. या प्रकल्पात त्यांनी करमणुक, मनोरंजन, खेळा, प्रबोधन, प्रशिक्षणाचीही सोय उपलब्ध करुन दिली आहे. हा प्रकल्प श्रीमंतासाठी नसुन गरीबातील गरीब माणसांसाठी आहे. असे देशातील प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात खेड्यात तयार व्हावे. त्यातुन ग्रामीण लोकांचे जीवन बदलुन लोकांचे जीवन सस्टीनेबल होईल. ना नफा-ना तोटा या तत्वावर हा प्रकल्प तयार करुन देशात राबवण्यासाठी आराखडा तयार करावा, असेही त्यानी सुचवले.

श्री. चरेगावकर म्हणाले, देशातील प्रत्येकाला स्वतःचे परवडणारे घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने केलेली एक कृती म्हणजे हा प्रकल्प आहे. ग्रामीण भागात नवे व्यवसाय सुरु व्हावेत, तरुण वर्गास रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग सुरु व्हावेत, यासाठी त्यांना या प्रकल्पात घरे व जागा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील युवकांकडे उत्तम क्रीडा कौशल्य असते, पण त्यांना ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सरावास आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात. याचीच दखल घेवून या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे टर्फची निर्मिती केली आहे.

सी लिंकची मागणी

कऱ्हाडचा जुना कोयना पूल ते नवीन कृष्णा पूल यांना जोडणारा नवीन सी लींक रोड तयार करावा, अशी मागणी शेखर चरेगांवकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. कऱ्हाडच्या कृष्णा पुल आणि कोयना पुल जोडण्याची संकल्पना राबवली तर सी लिंकची संकल्पना साकारु शकते. त्यामुळे कऱ्हाडला एक वेगळे महत्व प्राप्त होवुन शहराच्या वैभवातही त्यातुन भर पडणार आहे, सांगुण कोल्हापूर नाका येथे भराव पुलाच्या ऐवजी उड्डाण पूल करावा असे सुचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ?

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT