Ayushman Bharat E-shram Card esakal
सातारा

आता कैद्यांना मिळणार आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात देशातला पहिलाच उपक्रम

जिल्हा कारागृहात १८ महिला अंडरट्रायल कैद्यांसह सुमारे ३५० कैदी बंद आहेत. या उपक्रमासाठी कैद्यांची शिधापत्रिका व आधार कार्ड असणे आवश्यक असते.

सकाळ डिजिटल टीम

आयुष्मान भारत कार्ड प्रदान केल्यामुळे जामीन मिळवून किंवा शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर गेल्यावरही त्यांना वैद्यकीय लाभ मिळू शकणार आहे.

सातारा : कैद्यांच्या (Prisoners) आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न सुरक्षित करण्यासाठी त्यांचे आयुष्मान भारत (Ayushman Bharat) व ई-श्रम कार्ड (E-Labour Card) काढण्याचा उपक्रम जिल्हा कारागृहामध्ये राबविण्यात येत आहे. देशातील कारागृहांमध्ये (Jail) साताऱ्यात हा पहिलाच राबविला जात आहे.

समता फाउंडेशनचा पुढाकार

मुंबईच्या समता फाउंडेशनकडून (Mumbai Samata Foundation) राज्यातील कारागृहांमध्ये प्रत्येक महिन्याला त्वचारोग शिबिर व नेत्र शिबिर आयोजित केले जाते, तसेच या आजारांवर औषध उपचार करून विनामूल्य औषधे व चष्मे देण्यात येतात. सातारा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून कैद्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आयुष्मान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड काढण्याचा उपक्रम हाती घेण्याबाबत चर्चा केली. त्याला संमती दर्शवत तातडीने जिल्हा कारागृहात या उपक्रमाला प्रतिनिधी आदित्य उखळकर व विश्र्वजित बागल यांनी सुरुवात केली.

अधिकाऱ्यांचा पाठिंबा

देशात प्रथमच होणाऱ्या अशा प्रकारच्या संकल्पनेला राज्याचे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक शेडगे यांनी जिल्हा कारागृहात हा उपक्रम सुरू केला.

६५ बंद्यांची कार्ड निघाली

जिल्हा कारागृहात १८ महिला अंडरट्रायल कैद्यांसह सुमारे ३५० कैदी बंद आहेत. या उपक्रमासाठी कैद्यांची शिधापत्रिका व आधार कार्ड असणे आवश्यक असते. ही कागदपत्र उपलब्ध असलेल्या कारागृहातील ६५ जणांचे आयुष्मान भारत व ई-श्रम कार्ड काढण्यात आले आहे. कारागृहात आलेले बहुतेक कैदी गरीब असतात. आयुष्मान भारत कार्ड प्रदान केल्यामुळे जामीन मिळवून किंवा शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर गेल्यावरही त्यांना वैद्यकीय लाभ मिळू शकणार आहे.

संपूर्ण राज्यात होणार उपक्रम

जिल्हा कारागृहातून महिन्याला अनेक कैदी बाहेर पडतात व अन्य गुन्ह्यातील संशयितांचा तुरुंगात प्रवेश होत असतो. अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. आयुष्मान भारत कार्ड नसल्याने राज्य सरकारच्या कारागृहात असल्याने कैद्यांचा वैद्यकीय खर्च सरकारला करावा लागतो. त्यामुळे ही योजना राज्यभरातील इतर कारागृहांतही राबविला जाणार आहे.

पाच लाखांपर्यंतचा लाभ

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत साधारण एक हजार २०० आजारांवर पाच लाखांपर्यंत विनामूल्य उपचार मिळण्यास मदत होते. कैद्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

या उपक्रमाची संकल्पना मांडल्यावर कारागृह सुरक्षेची काळजी घेऊन वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, तुरुंग अधिकारी राजेंद्र भापकर, सुभेदार महेंद्र सोनवणे, मानसिंग बागल, भिसे, हवालदार दारकू पारधी, राजेंद्र शिंदे हवालदार, बर्डे, नामदेव खोत, दिलीप बोडरे, प्रतीक्षा पवार, अंकिता करपे, रेश्मा गायकवाड, रूपाली नलवडे, अहमद संदे, रणजित बर्गे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दळे, चेतन शहाणे, बालाजी मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी करता येत आहे.

-शामकांत शेडगे, अधीक्षक, जिल्हा कारागृह, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawr : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT