सातारा

चर्चाच चर्चा : पृथ्वीराज चव्हाणांचा वाढदिवसाचा फ्लेक्स ठरणार 'जनशक्ती'साठी पाॅवरगेम

सचिन शिंदे

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिनी शहरात शुभेच्छांचे अनेक फलक झळकले आहेत. त्या सगळ्याला राजकीय झालर आहेच. मात्र, दत्त चौकापासून मुख्य रस्त्यावरील एक फ्लेक्‍स सर्वाधिक चर्चेचा ठरला. मूळच्या जनशक्ती आघाडीला पुनरुज्जीवित करण्याचे संकेत त्या फ्लेक्‍सने दिले आहेत. त्यामुळे तो फ्लेक्‍स पृथ्वीराज यांच्या वाढदिनीच पालिकेच्या वर्तुळातील राजकारणाची नवी नांदी देणाराही ठरला.

पृथ्वीराज चव्हाण यांचा बुधवारी वाढदिवस झाला. तो साजरा होणार नसला तरी शहरात फ्लेक्‍स मात्र मोठ्या प्रमाणात झळकले आहेत. चौकाचौकांत पृथ्वीराज यांच्या कौतुकाच्या सोहळ्यांचे फ्लेक्‍स इच्छुकांना हायलाइट करत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे. त्या सगळ्यात मुख्य बाजारपेठेतील "जनशक्ती आघाडी' म्हणून लावलेला फ्लेक्‍स अधिक चर्चेत आहे. त्या फ्लेक्‍सवर (कै.) जयवंत जाधव, अरुण जाधव, शारदा जाधव, बापूसाहेब मोरे, अतुल शिंदे व रमेश लुणिया यांची छायाचित्रे आहेत. जयवंत जाधव यांच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या मूळ "जनशक्ती'चे हे सारे घटक आहेत. ते तब्बल 20 वर्षांनी फ्लेक्‍सवर झळकल्याने कऱ्हाड पालिकेचे राजकारण वेगळ्या वळणावर निघाल्याची मोठी चर्चा आहे. जनशक्ती आघाडी म्हणून जाधव गट पुन्हा एकदा मुख्य बाजारपेठ, दत्त चौक, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, नेहरू चौक, रविवार पेठ आदी भागात उदयास येत असून त्याला पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद मिळत आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या शब्दात वाचा : मध्यरात्रीच झाली माझी राजकीय पहाट!

शहरात पालिकेच्या राजकारणाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिकेत सत्ताधारी व विरोधक कोण, यावरूनही बेछुट आरोप होत आहेत. भाजपच्या नगरसेवकांनीही हल्लाबोल केला. त्यात जनशक्ती आघाडीचे नाव लावण्यावरूनही आरोप झाले. जनशक्ती आघाडीचे नेते अरुण जाधव यांनाही बोलावले जात नसल्याचे आरोप होतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचा घात केल्याचा आरोपही झाला. त्याला अद्यापही प्रत्युत्तर दिलेले नाही. सध्या सर्वच राजकीय हालचाली वाढल्या असतानाच बुधवारी झळकलेला फ्लेक्‍स सर्वाधिक चर्चेचा ठरतो आहे. त्यामुळे मूळची जनशक्ती आघाडी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

हे बघा! उसाला पक्ष नसतो, सभासदांच्या हितासह निकोप सहकार कायम ठेवण्यासाठी मी निवडणूकीच्या रिंगणात 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT