EWS Certificate sakal
सातारा

SEBC Certificate : एसईबीसीमुळे खुल्या प्रवर्गाची अडचण; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे पुन्हा सुरू करण्याची मागणी

ईडब्ल्यूएसऐवजी आता एसईबीसीचे दाखले देण्याचा निर्णय झाल्यामुळे बहुतांशी ठिकाणी ईडब्लूएसचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे जे एसईबीसीमध्ये येत नाहीत, अशा लोकांची अडचण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा - ईडब्ल्यूएसऐवजी आता एसईबीसीचे दाखले देण्याचा निर्णय झाल्यामुळे बहुतांशी ठिकाणी ईडब्लूएसचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे जे एसईबीसीमध्ये येत नाहीत, अशा लोकांची अडचण झाली आहे. त्यांना हा दाखला मिळवताना कसरत करावी लागत आहे. त्यासाठी शासनाने काही खुल्या प्रवर्गातील जातींसाठी हे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सुरू करणे आवश्यक आहे.

काय आहे ईडब्लूएस...

ईडब्लूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असे आहे. कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ईडब्लूएस म्हणून संबोधले जाते. जरी इतर आर्थिक घटक असू शकतात, तरीही नागरिकांच्या किंवा कुटुंबाच्या आर्थिक असुरक्षिततेची पातळी निश्चित करण्यासाठी उत्पन्न हा मुख्य घटक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा सामान्य श्रेणीतील नागरिकांसाठी वापरला जातो. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जानेवारी २०१९ पर्यंत, केंद्र सरकारने ईडब्लूएस श्रेणीतील लोकांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षणाची परवानगी दिली होती.

एसईबीसी म्हणजे काय...

एसईबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग होय. सरकारद्वारे मागास समजल्या जाणाऱ्या सर्व जातींचे हे दुसरे नाव असल्याचे मानले जात आहे. हे लोकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित सरकारने केलेले वर्गीकरण आहे. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच्या आधारावर, केंद्र सरकार त्यांच्या काही नागरिकांचे वर्गीकरण करते.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देणे झाले बंद...

मराठा प्रवर्गासाठी राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर केले. पूर्वी आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना ईडब्ल्यूएसई (Economically Weaker Section Eligibility) प्रमाणपत्र मिळायचे; परंतु स्वतंत्र आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाला हे प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. मराठा बांधवांना आता एसईबीसी (Socially and Economically Backward Classes) प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे. ही सर्व प्रक्रिया तहसील कार्यालयात होते.

‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे....

अर्जदाराचे आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, रक्तातील दोन नातेवाईकांचे टी. सी. किंवा निरक्षर असल्याचे शपथपत्र, तसेच आधार कार्ड, मतदान कार्ड, दहावी किंवा बारावी गुणपत्रक (स्पेलिंगसाठी), वंशावळ, अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास पालकांचा फोटो, वडिलांचा १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या ‘मराठा’ अशी जात नमूद असलेला शाळेचा दाखला किंवा मराठा जात प्रमाणपत्र, वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध नसल्यास कुटुंबातील १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या ‘मराठा’ अशी जात नमूद असलेला शाळेचा दाखला, मराठा उल्लेख असलेले जन्म-मृत्यू नोंदीचा महसूल अभिलेखातील उतारा, सरकारी नोकरदाराच्या सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील जातीची नोंद अथवा समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जात प्रमाणपत्र, मराठा असा उल्लेख असलेला इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील शाळा सोडल्याचा दाखला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT