Karad: पुणे ते कोल्हापूरपर्यंतच्या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात रस्ता उखडलेला आहे. अशा स्थितीत सरकारचे टोल न घेण्याचे धोरण असायला हवे, मात्र तरिही टोल घेतला जातो आहे, ते कायद्यात बसणारे नाही. टोलनजकच्या गावांना मोफत पास देण्याची गरज आहे, तेही दिले जात नाहीत.
त्यामुळे त्या सगळ्या विरोधात येत्या तीन ऑगस्टला कॉग्रेस आक्रमक होत आहे. त्या दिवशी पुणे ते कोल्हापूर या रस्त्यावरील टोल नाक्यावर शांतातपूर्ण स्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदत दिली.
चव्हाण म्हणाले, पुणे ते कोल्हापूर या दरम्यानच्या महामार्गावरील टोलवर आंदोलन होईल. तीन ऑगस्टला अत्यंत शांततेत आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार आहोत. त्यात वाहनधारांकाना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी कॉग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी घेणार
कोल्हापूरसह या भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे, त्याकडे केंद्र व राज्याचे दुर्लक्ष आहे, असी टिका करून आमदार चव्हाण यांनी म्हणाले, बिहार व उत्तर प्रदेशाला विशेष दर्जा देण्याऐवजी त्यांना भरघोस निधी देण्याची घोषणा म्हणजे अर्थसंकल्पात केली आहे. त्याव्दारे त्यांची फसवणुक होत आहे. वास्तविक सरकार वाचवण्यासाठीच्या मोदी सरकारचा तो प्रयत्न आहे, बिहार, उत्तर प्रदेशाच्या त्या तुलनेत महाराष्ट्राला काहीच मदत केलेली नाही.
ते त्यांचा दुजाभाव सहज दिसतो आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्याचा तोंडाला पाने पुसली आहेत. वास्तविक या भागातील महापुरावर ठोस उपाय व्हायला हवा. या बागातील शेती किंवा त्यांच्या जमिनी दहा दिवसापेक्षा जास्त दिवस पाण्याखाली आहेत. त्यांचे पंचनामे व्हावेत, त्यांना ठोस नुकसान भरपाई देण्याचे धोरण सरकारने राबवावे.
राजकीय नेत्यांच्या आरोपावर श्री. चव्हाण म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकक आहे. अशा स्थितीत गृमंत्र्यावर होणारे आरोप गंभीर आहेत. माजी गृहमंत्र्यावर अनिल देशमुख यांनी जाहीर आरोप केलेले आहेत. अत्यंत गंभीर आहेत. विरोधकांची नैतिक स्तर किती खालावला आहे, त्याचे उदाहरण त्यातून समोर येते आहे.
५० कोटींच्या खोक्यांचा घोडेबाजार करत भाजपने केलेल्या सरकारच्या नैतिकतेचा स्तर असाच अशणार आहे, तेच यातून स्पष्ट होते. माजी गृहमंत्री देशमुख यांना ईडी अटक केली होती. ती अटक टाळण्यासाठी त्यांना काही प्रस्ताव देण्यात आले होते, ते त्यांनी सप्रमाण समोर आणले आहे. ती गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. वास्तविक जो काही घोडोबाजार झाला, तो मोदींचा आर्शिवादानेच झालाहोता. त्या फोडाफोडीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे राज्यातील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.