Agarwal Family MPG Club Resort Seal Mahabaleshwar esakal
सातारा

Pune Porsche Accident : अगरवाल कुटुंबीयांचे MPG Club रिसॉर्ट सील; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महाबळेश्वरात मोठी कारवाई

सकाळ डिजिटल टीम

दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने रिसॉर्टमधील बार सील केला होता.

महाबळेश्वर : येथील एमपीजी क्लब (MPG Club) हे अगरवाल कुटुंबीयांचे रिसॉर्ट काल (शनिवार) सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Collector Jitendra Dudi) यांच्या आदेशाने सील करण्यात आले. या रिसॉर्टमधील ३२ रूम्स आठ वूडन कॉटेजेस व जिम, स्पा, किचन, कर्मचारी खोल्या अशा इतर खोल्याही सील करण्यात आल्या. ही कारवाई तब्बल पाच तास सुरू होती.

या वेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महाबळेश्वर- तापोळा रस्त्यावरील जुनी पारसी जिमखाना सध्याची एमपीजी क्लब रिसॉर्ट ही शासकीय मिळकत कराराने पारशी जिमखाना ट्रस्टला केवळ रहिवास वापरासाठी दिली होती. काही वर्षांपूर्वी पारशी जिमखाना ट्रस्टवर सुरेंद्रकुमार अगरवाल यांना घेण्यात आले.

त्यानंतर काही वर्षांमध्ये या ट्रस्टवर असलेल्या लोकांची नावे कमी करून त्याजागी अगरवाल कुटुंबातील व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून लावण्यात आली. ही शासकीय भाडेपट्ट्यावरील मिळकत केवळ रहिवासी वापरासाठी असताना काही वर्षांपूर्वी येथे आलिशान रिसॉर्ट सुरू झाले. त्यानंतर पर्यटकांना राहण्यासाठी आठ वूडनच्या टेंटची उभारणी केली. साधारण दीड महिन्यापूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या रिसॉर्टबाबत एक तक्रार दाखल केली.

त्यानंतर पुणे येथील अपघातानंतर महाबळेश्वर येथील शासकीय मिळकतीमध्ये असलेली आलिशान एमपीजी क्लब रिसॉर्टबाबतचे प्रकरण लोकांसमोर आले. यामध्ये अनेक भानगडी असल्याचे माध्यमांतून बाहेर आल्यानंतर दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने रिसॉर्टमधील बार सील केला होता. रिसॉर्ट सील न केल्याने हवालदार यांनी संतापही व्यक्त केला होता. मात्र, आज सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने एमपीजी क्लब या आलिशान रिसॉर्टला प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी कार्यवाहीस सुरुवात केली.

रिसॉर्टमधील ३२ आलिशान रूम्स त्यानंतर आठ वूडन कॉटेजेसमधील रूम, रिसॉर्टमधील स्पा, जिम, किचन स्टाफ रूमला देखील टाळे ठोकले. त्यानंतर रिसॉर्टच्या मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करून रिसॉर्टमधील अनधिकृतरीत्या उभारलेले रूम्सवरही प्रशासनाने हातोडा टाकावा, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT