MP Udayanraje Bhosale esakal
सातारा

'त्या काळात आम्ही दगडाला शेंदूर फासला तरी लोक निवडून देतील'; असं कोणाला उद्देशून म्हणाले उदयनराजे?

शेतकरी आपल्या कृषिप्रधान देशाचा कणा आहे. शेतकरी सक्षम झाला तरच देशाची प्रगती होते.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रात पंतप्रधान मोदी आणि राज्यात शिंदे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे.

पुसेगाव : शेतकरी आपल्या कृषिप्रधान देशाचा कणा आहे. शेतकरी सक्षम झाला तरच देशाची प्रगती होते. केंद्रात पंतप्रधान मोदी आणि राज्यात शिंदे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी आमच्या सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्‍या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, धैर्यशील मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेसचे नेते रणजित देशमुख, माजी आयुक्त सुरेश जाधव, चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ.

तसेच सचिन देशमुख, गौरव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, सभापती अण्णा वलेकर, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सुनील काटकर, राजेश देशमुख, मोहनराव पाटील, सरपंच घनश्याम मसणे, स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे उपस्थित होते.

उदयनराजे पुढे म्हणाले, ‘‘प्रगत देशांप्रमाणे इर्मा योजनेची हजारो कोटींची सबसिडी उद्योजकांना देण्यापेक्षा विमा कंपन्यांना देणे गरजेचे आहे. त्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे शक्य होणार आहे. लवकरच तसा निर्णयही घेण्यात येणार आहे. पूर्वी हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नंतर पवारांच्या पक्षाची निर्मिती झाली. त्या काळात आम्ही दगडाला शेंदूर फासला तरी लोक निवडून देतील, असे नेते म्हणायचे. आता परिस्थिती बदलली आहे.’’ यावेळी आमदार महेश शिंदे यांचेही भाषण झाले.

चेअरमन रणधीर जाधव म्हणाले, ‘‘१० जानेवारीलाच सेवागिरी महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. योगायोगाने यंदाचा रथोत्सव तिथी आणि तारखेनुसार पार पडत आहे. अकरा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खिलार जनावरांचे मोठे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर विश्वस्त बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.

‘शेतीनिष्‍ठ’ शेतकऱ्यांचा गौरव

कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा श्री सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन केल्यानंतर मान्यवरांनी सर्व स्टॉल्सना भेट दिली. पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024: भाजप अन् एकनाथ शिंदेंचा विरोध तरी अजित पवारांनी मलिकांना का बनवले 'नवाब'?

Viral Video: एक मिनिट उशीर झाला अन् माजी मंत्र्याचं विधानसभेचं मैदान हुकलं! अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय घडलं?

IND vs NZ 3rd Test : मुंबईतही असणार संघ निवडीचा पेच? हर्षित राणाची निवड, बुमराला विश्रांती की, तीन वेगवान गोलंदाजासह खेळणार

Diabetic Friendly Diwali Sweets : यंदा दिवाळीत मधुमेहींनी गोडधोड पदार्थांचा घ्या पुरेपूर आनंद,या आहेत खास रेसिपी

Ayodhya Deepotsav 2024 : २५ लाख दिव्याने उजळणार अयोध्या! श्री राम जन्मभूमीत होणार विश्वविक्रम; 'हे' असेल मुख्य आकर्षण

SCROLL FOR NEXT