Pusesawali Riots Muslim Organizations esakal
सातारा

Pusesawali Riots : मुस्लिम संघटनांच्या मूक मोर्चाला प्रशासनाचा नकार; पुसेसावळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर आव्हान

संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मोर्चाचा तिढा कायम राहिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मूक मोर्चा व शांतता फेरी काढण्याची परवानगी मिळावी, यासाठी गेल्या चार दिवसांपासून खल सुरू आहे.

सातारा : पुसेसावळी येथील (Pusesawali Riots) घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यातील मुस्लिम संघटनेसह (Muslim Organizations) विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी मूक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने या मूक मोर्चास नकार दिला आहे.

तर, संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मोर्चाचा तिढा कायम राहिला आहे. सातारा शहरात शनिवार (ता. १६) सकाळी ११ वाजता मूक मोर्चा व शांतता फेरी काढण्याची परवानगी मिळावी, यासाठी गेल्या चार दिवसांपासून खल सुरू आहे. याबाबत विविध संघटना पोलिस अधीक्षक समीर शेख यांना भेटण्यासाठी गुरुवारी एकत्र आले.

त्यावेळी हा मोर्चा स्थगित झाल्याचे काही संघटनांच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात येत होते. या स्थगित झालेल्या मोर्चाबाबत विविध संघटनांच्या वतीने सायंकाळी पाच वाजता निवेदन देण्याचे ठरले होते. मात्र, दुपारनंतर संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये एकमत न झाल्याने संघटनांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याचे ठरले.

त्यानुसार रात्री उशिरापर्यंत बैठक झाली; पण प्रशासन मोर्चा काढू नये, याच भूमिकेवर ठाम होते, तर संघटना मूक मोर्चा काढणारच, या भूमिकेवर ठाम राहिल्याने या मोर्चाबाबतचा तिढा कायमच राहिला आहे. याबाबत शुक्रवारी दुपारपर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT