crime sakal
सातारा

Satara : पोलिसांवर दबाव आणणे पडले महागात

म्हसवड येथे सोनाराला लुटले

सकाळ वत्तसेवा

संशयित कितीही हुशार असला, तरी त्याच्या काही संशयास्पद हालचाली व त्याच्या मोबाईलवरून संपर्क त्याला अडचणीत आणतो. म्हसवड येथे सोनाराला लुटले होते. त्या चोरीच्या तपासातही पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठला. तक्रार देणाऱ्यासोबत आलेला त्याचा साथीदार चोर ठरला. पोलिसांनी त्याच्यासह लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. सोनारालाच लुटून त्याच्या लुटीच्या तपासात पोलिसांवर दबाव आणण्याचे संशयिताला महागात पडले. घटना झाली त्या दिवशीचे लोकेशन, त्यानंतरच्या फोन कॉल्सवरून अत्यंत पद्धतशीरपणे १८ लाखांची चोरी पचविण्याचा संशयितांचा प्रयत्न फसला.

- सचिन शिंदे, कऱ्हाड

म्हसवड येथे २७ जुलै २०२२ रोजी सोनाराला लुटले गेले. त्याला मारहाण करून त्याच्याकडील १७ लाख ८३ हजार ७८० रुपयांचे सोने लुटले गेले. जबरी चोरीचा गुन्हा त्या दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजता पोलिसांत दाखल झाला. तक्रारदार दुचाकीवरून कासारवाडी (ता. माण) येथून म्हसवड ते माळशिरस रस्त्याने निघाले होते. त्यावेळी श्री फार्म हाऊसजवळ अचानक दोन अनोळखी व्यक्तींनी तक्रारदाराच्या दुचाकीला धडक दिली.

त्यांना खाली पाडून जखमी केले व तक्रारदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील १५ लाख ६२ हजारांचे सोन्याचे दागिने लुटले. तक्रारदार बॅग सोडत नसल्याने त्याचे बंध चाकूने कापून सोन्याची बॅग लंपास करण्यात आली. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना तपासाच्या सूचना केल्या. श्री. देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व फौजदार अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.

तपासाचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू झाले. त्या वेळी पोलिसांनी काही मोबाईल क्रमांकावर लक्ष केंद्रित केले. सोनाराला ज्या दिवशी लुटले गेले. त्या दिवशी त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या मित्रावरही पोलिसांनी संशय घेतला. तपासाबाबत प्रमाणापेक्षा जास्त चौकशी करत असल्याने तो पोलिसांच्या रडारवर आला. त्याच्या मोबाईलच्या डिटेल्सही पोलिसांनी घेतल्या. त्या वेळी त्याच्यातील काही क्रमांक अडचणीचे व लुटीदिवशी व त्यानंतर सातत्याने त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी जे त्याच्या संपर्कात आहेत. त्यांची माहिती काढली. त्यांना चौकशीला उचलल्यानंतर सारेच बिंग बाहेर आहे.

तपास पथकाने सातारा, सोलापूर जिल्ह्यांत जाऊन गोपनीय माहिती मिळवली. त्यानुसार लुटलेल्या सोनाराच्या येणाऱ्या- जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर फोन कॉल्स व त्याच्या डिटेल्सवरून सोनाराच्या म्हसवडमधील एका साथीदारानेच गुन्हा केल्याचे उघडकीस आले. त्यावरही पोलिसांनी लक्ष केंद्रित करत लुटणाऱ्यांना आधीच उचलले. सोनाराच्या साथीदाराला जेरबंद केले. तपास पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपास गती घेत होता. अधिक माहिती काढली असता म्हसवडमधील संबंधित सोनाराने त्याच्या माळशिरस (जि. सोलापूर) व धुळदेव, मासाळवाडी (ता. माण) येथील साथीदारांसह गुन्हा केल्याची खात्री झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT