वडूज (सातारा) : येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजची (Hutatma Parshuram Vidyalaya And Junior College Vaduj) विद्यार्थिनी राधिका संजय इंगळे (Student Radhika Ingle) हिने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत (National Talent Search Examination) राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. तिला १७६ गुण व मानसिक क्षमता चाचणी विषयात ९२ गुण मिळाले. यापूर्वी २०१९ मध्ये राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा, नौरोजी वाडिया कॉलेजच्या (Naoroji wadia college) महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत तिने राज्यात पहिला क्रमांक पटकविला आहे. (Radhika Ingle Ranks First In Maharashtra In National Talent Search Examination Education Marathi News)
राधिका इंगळे हिने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे.
त्याशिवाय या परीक्षेत विद्यालयाच्या चिन्मय अनिल इनामदार (१६९ गुण), मृणाल धनाजी कटरे (१६४), रणजित दत्ताजी शिंदे, संस्कृती सोमनाथ कुलकर्णी यांनी प्रत्येकी (१५० गुण) मिळवून राज्यस्तरीय गुणवता यादीत स्थान मिळविले आहे. विद्यालयाच्या ४२ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेने सुरू केलेल्या गुरुकुल पॅटर्नच्या विद्यार्थ्याची ही पहिली बॅच होती.
यशस्वितांना गुरुकुल विभागप्रमुख माजी प्राचार्य मिलिंदकुमार घार्गे, विभागप्रमुख डी. सी. पंडित, एस. एस. जमादार, एस. एच. काळे, ए. एम. राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितांचे समिती सदस्य डॉ. हेमंत पेठे, सतीश शेटे, नितीन जाधव, गोविंद भंडारे, प्राचार्या एन. एस. दौंड, उपमुख्याध्यापक एम. एस. गोडसे, पर्यवेक्षक डी. जे, फडतरे, बी. एस. माने आदींनी अभिनंदन केले.
प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक आल्याने मी खूपच आनंदी असून या यशात माझ्या वर्ग शिक्षकांसह कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. यानंतरच्या विविध परीक्षांत देखील माझी अशीच कामगिरी राहणार आहे.
-राधिका इंगळे, विद्यार्थिनी.
Radhika Ingle Ranks First In Maharashtra In National Talent Search Examination Education Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.