rahimatpur muncipal  sakal media
सातारा

रहिमतपुरात राष्ट्रवादीची षटकारासाठी चाचपणी

विविध विकासकामांचा धडाकाही सुरू; विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही मोर्चेबांधणीसाठी बैठकांचा वेग

इम्रान शेख

रहिमतपूर : येथील पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी षटकार खेचण्यासाठी समिकरणांची चाचपणी करताना दिसतो आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही मोर्चेबांधणीसाठी बैठकांचा वेग वाढवला आहे.

येथील पालिकेचा आजवरचा राजकीय इतिहास पाहता रहिमतपूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असल्याचे स्पष्‍ट दिसते आहे. सध्याच्या पालिकेतील १७ जागांचे बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, काँग्रेसचे तीन व शिवसेना एक अशी परिस्थिती आहे. मागील निवडणुकीवेळी अनेक उलथापालथी झाल्याचे सर्वांनी पाहिले होते. ऐन निवडणुकीच्यावेळी चित्रलेखा माने-कदम या राष्ट्रवादीच्या सुनील माने यांच्या गोटात सामील झाल्याने निवडणुकीपूर्वीच काँगेसला धक्का दिला होता.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सर्व विरोधकांना सामावून घेण्याची रणनीती आखली असल्याने रहिमतपूरमध्ये विरोध करणाऱ्यांचा आकडा कमी झालेला आहे. त्याचबरोबर शहरांध्ये सुनील मानेंच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांच्या उपस्थितीत अनेक विकासकामांच्या उद्‌घाटनांचा धडाका आत्तापासूनच सुरू झालेला आहे. तसेच या निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर विरोधाला विरोध न करता सुनील माने यांच्याबरोबर राहणार असल्याचे शिवसेनेचे नेते वासुदेव माने यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही विकासकामांसाठी म्हणावा तसा निधी आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जी शक्ती मिळाली पाहिजे, ती मिळत नसल्याने काँग्रेसचे नेते नीलेश माने आपल्या कार्यकर्ते व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेला मागीलवेळी खाते उघडता आले असले तरी शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे-पाटील यांचे कर्मभूमीकडे दुर्लक्षच राहिले आहे. बानुगडे-पाटील यांनी पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना जी शक्ती दिली पाहिजे, ती दिली नसल्याने त्यांचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. तरी पक्ष आदेश झाला तर शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू आहे. सध्या तरी पालिका निवडणूक ही दुरंगी होण्याचे चित्र असून, इच्छुकांची संख्या, प्रभाग रचनेवर पुढील चित्र अधिक स्पष्ट होईल.

काँग्रेसच्या ‘हाता’ला भाजपचा हिरवा कंदील!

काँग्रेसच्या ‘हाता’बरोबर राहूनही निवडणुकीच्यावेळी ‘हाता’ची साथ मिळत नसल्यामुळे रहिमतपूर पालिका विरोधी पक्षनेत्याची ‘कमळा’कडे वाटचाल सुरू असून, ‘कमळा’कडूनही यासाठी हिरवा झेंडा फडकत असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे.

समोरासमोर की एकत्र लढणार?

रहिमतपूर पालिकेत मागील गेल्या काही निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना असे तीन पक्ष एकमेकांविरोधात लढताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळत आहे. अशी स्‍थिती असताना सध्या राज्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहे. त्यामुळे येथील पालिकेची निवडणूक आघाडीच्या घटक पक्षांत समोरासमोर होणार की सर्वजण एकत्र येऊन करणार, याबाबतही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT