सातारा

कर्मचा-यांच्या कामकाजावरुन नगरसेवक आक्रमक; रहिमतपूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी उपाययोजनेचे आश्वासन देत घेतले सावरुन

इम्रान शेख

रहिमतपूर (जि. सातारा) : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक चॉंदगणी आतार यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी रहिमतपुरात राहून सेवा देण्याचा आग्रह धरला, तद्वत नगरसेवक शिवराज माने, रमेश माने, अनिल गायकवाड, नगरसेवक माधुरी भोसले यांनीही कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अखेर मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी यावर उपाय काढण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगरसेवकांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. 

सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या आमदार नियोजन विभागातून भरीव निधी मंजूर केल्याबाबत आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पालिका विकासासाठी 4.5 एकर जागा दिल्याने त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. सभेत अपूर्ण कामांना मुदतवाढ देऊन आर्थिक वर्षात कामाचे ठेके देण्याबाबत चर्चा झाली. त्यात व्यायामशाळा चालवण्यास देणे, पालिका साधनसामुग्री आदी विषयांवर ठेके देण्याबाबत चर्चा करण्यात आली. आलेल्या अर्जांवर चर्चा करून चुकीच्या पद्धतीने पडलेले आरक्षण उठवण्यासाठी चर्चा करण्यात आली. शिक्षक बॅंकेसमोर तयार झालेल्या गाळेवाटपासाठी आलेल्या अर्जांवरही चर्चा करण्यात आली. शहरातील जुन्या सिमेंटच्या पाणीपुरवठा पाइपची माहिती घेऊन त्या बदलणे याबाबतही चर्चा झाली. माझी वसुंधरा योजनेतील वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली. भटक्‍या कुत्र्यांपासून समाजाला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन त्यावर समिती नेमून योग्य ती उपाययोजना करण्याची चर्चा सभागृहात करण्यात आली. 

पालिकेतील स्थायी समिती निविदा काढत असताना सर्वसाधारण सभेत विषय मांडत नसल्याने इतर नगरसेवकांना याबाबत काही माहिती मिळत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते नीलेश माने यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर चंद्रगिरी कचरा डंपिंग ग्राउंडलगत भटक्‍या कुत्र्यांची समस्या मांडत त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. बाजारपेठेमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह हा विषय मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबतही त्यांनी विषय मांडला. त्यावर नगराध्यक्ष आनंद कोरे यांनी शिक्षक बॅंकेसमोर महिला स्वच्छतागृहाचे काम सुरू असल्याची माहिती दिली. 

जागेअभावी इतर ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करता येऊ शकत नाहीत. जर जागा असेल तर आणखीन स्वच्छतागृहे उभारू, अशी माहितीही त्यांनी दिली. सभेत विविध विकासकामांना मुदतवाढ देण्याबरोबर आलेल्या अर्जांवर चर्चा करून निर्णयही घेण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा सुरेखा माने, नगरसेवक बेदिल माने, विद्याधर बाजारे, शशिकांत भोसले आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. 

वाहनांच्या वाढत्या वेगाने अपघातांत वाढ, वाहतूक कोंडी याबाबत सकाळ माध्यम समूहाने आवाज उठविला हाेता. त्याची दखल घेत सर्वसाधारण सभेत या विषयांवर चर्चा करण्यात आली. एसटी स्टॅंड चौक, चांदणी चौक याठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ठेकेदाराशी बोलून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. त्याचबरोबर प्रमुख बाजारपेठेतील वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येवरही चर्चा करण्यात आली. 

सत्यशोधक चळवळीतील उषादेवी साबळे-पाटील यांचे निधन

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT