सातारा (रेठरे बुद्रुक) : रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर आणि कर्नाटक भागाला जोडणाऱ्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. कऱ्हाड ते कुर्डुवाडीपर्यंत लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वर्षभरापासून पूर्ण असून, त्या मार्गावर विजेवरील रेल्वेगाड्या सोडल्या जात नसल्याने प्रवाशांतून नाराजीचा सूर आहे. या मार्गावर विजेवरील रेल्वे सोडण्यास मुहूर्त कधी सापडणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
कऱ्हाड ते कुर्डुवाडी हा सुमारे १६५ किलोमीटरचा लोहमार्ग दोन टप्प्यात आहे. त्यामधील मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कऱ्हाड ते मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंशतः पूर्ण झाले आहे. कुर्डुवाडीसह पंढरपूर, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, भिलवडी व कऱ्हाड ही महत्त्वाची स्थानके या मार्गावर आहेत. दुहेरीकरण झालेल्या शेणोली, भवानीनगर, ताकारी टप्प्यातील मार्ग सध्या दुहेरी वाहतुकीसाठी वापरला जात आहे. मात्र, त्या मार्गावरील विद्युतीकरण वापराविना आहे. सध्या काही मालगाड्या विजेवरील इंजिनासह सोडल्या जात आहेत.
विशेषतः मिरज ते कुर्डुवाडी मार्गावर मोठ्या संख्येने विजेवरील मालगाड्या धावत आहेत. प्रवासी गाड्यांना मात्र त्याचा फायदा झालेला नाही. रेल्वे बोर्डाने विद्युतीकरणाची चाचणी घेऊन हिरवा कंदीलही दाखवला आहे. तरीही डिझेलवरील गाड्याच सोडल्या जात आहेत. कोट्यवधी रुपये गुंतवून पूर्ण केलेले विद्युतीकरण वापराविना पडून आहे.
रेल्वेंची इंजिन बदलावी लागणार
पॅसेंजर स्वरूपात धावणाऱ्या गाड्या पूर्णपणे विजेवर सोडता येतील. पण, त्यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी गरजेची आहे. दक्षिण भारतातून उत्तरेकडे व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना डिझेल इंजिन आहेत. ती बदलावी लागतील. पुणे-मिरजदरम्यान दुहेरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळेही विजेवरील गाड्या सोडलेल्या नाहीत, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.