Koyna Dam esakal
सातारा

Koyna Dam : कोयनेत 65 दिवसांत 105.2 TMC 'रेकॉर्ड ब्रेक' पाणीसाठा

धरणात सध्या ८६.४८ टीएमसी पाणीसाठा

विजय लाड

कोयनानगर (सातारा) : मुसळधार पावसासाठी प्रतिचेरापुंजी (Cherrapunji) अशी ओळख बनलेल्या कोयना धरण (Koyna Dam) परिसरात ६५ दिवसांत पडलेल्या धुवांधार पावसाने (Heavy Rain) १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात १०५.२ TMC इतका रेकॉर्ड ब्रेक पाणीसाठा झाला आहे. धरणातून ३५ टीएमसी पाणीसाठा विनावापर, तर ४.२२ टीएमसी पाणीसाठा पायथा वीजगृहातून असा एकूण ३९ टीएमसी पाणीसाठा सोडला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्याने गत १३ दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात सताड उघडे असलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे कोयना प्रशासनाने अखेर बंद केले असले, तरी पायथा वीजगृह चालूच आहे. कोयना धरणात सध्या ८६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण परिचलन सूचिप्रमाणे धरणात सध्या असणारा पाणीसाठा जादा असल्याने पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे कोयना प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात येणार आहे.

चार महिन्यात ५,००० मिमी पर्जन्यमान पडणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात २ महिन्यातच ४,३०० मिमी पाऊस पडला आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ३३१० मिमी नवजा येथे ४२३१ मिमी, तर महाबळेश्वर येथे ४३०३ मिमी पावसाची नोंद केवळ ६५ दिवसात झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयनानगर येथे ३५ मिमी नवजा येथे ५५ मिमी तर महाबळेश्वर येथे ३५ मिमी पावसाची नोंद मंगळवार दिवसभरात झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सुध्दा मंदावली आहे. धरणात २२०६४ क्युसेक पाण्याची आवक येत आहे.

धरणाची जलपातळी २१४८.५ फूट असून धरणात ८६.४८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण परिचलन सूचिप्रमाणे धरणात ८३.५७ टीएमसी पाणीसाठा असणे बंधनकारक आहे. धरणात सध्या ३ टीएमसी पाणीसाठा जादा असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला, तरी पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन दिवसात पुन्हा उघडण्याचे कोयना प्रशासनाने जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT