प्रत्येक पोस्ट कार्यालयात पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
कऱ्हाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतीच पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Free Power Scheme) जाहीर केली आहे. त्या योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर मोफत सोलर बसविण्यात येणार आहे. या योजनेत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून एक कोटी कुटुंबांना प्रकाश देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यातील पोस्ट कार्यालयांची (Post Office) निवड केली आहे.
प्रत्येक पोस्ट कार्यालयात पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी मोबाईल (Mobile) ॲप्लिकेशनवर त्यांच्या वितरण कर्मचाऱ्याद्वारे लाभार्थ्यांची निवड निवासस्थानी जाऊन केली जाणार आहे. ज्यांना योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी त्यांची नोंदणी करण्यासाठी आठ मार्चपर्यंत जवळच्या पोस्ट कार्यालयात भेट द्यावी, असे आवाहनही शासनाने केले आहे.
pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्या पोर्टलवर नोंदणी करा. त्यानंतर राज्य निवडा. तुमची वीज वितरण कंपनी निवडा. तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा. मोबाईल नंबर टाका. ई-मेल प्रविष्ट करा. पोर्टलच्या सूचनांचे अनुसरण करा. ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉग इन करा. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा. एकदा तुम्हाला व्यवहार्यता मान्यता मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.
तसेच इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा. नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील. तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल. त्यानंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल चेक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.
महिन्यात ३०० युनिट्स वापरणाऱ्या लाभार्थ्यांसाठी त्यांचा प्रारंभिक खर्च अंदाजे ३० ते ४० महिन्यांत कव्हर केला जाईल. तरी पीएम सूर्य घर मोफत वीज या सरकारी योजनेचा लाभ घ्यावा.
-एम. डी. पाटील, डाक अधीक्षक, कऱ्हाड विभाग
वीजबिलात बचत
कार्बनवर मात करण्यासाठी दीर्घकालीन ऊर्जा आणि पर्यावरणीय सुरक्षा
सोलरचे आयुष्य सुमारे २५ वर्षे
भाड्याच्या घरात, रिकाम्या जागेवर देखील स्थापित केले जाऊ शकते.
स्थलांतरित केले जाऊ शकते.
किलोवॅटसाठी आठ ते १० चौरस मीटर छायामुक्त क्षेत्र
निवासी कुटुंबासाठी अंदाजे खर्च आणि अनुदान समर्थन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.