Bhairavnath Temple  esakal
सातारा

भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ठेवा! किकलीच्या पुरातन मंदिरात सापडले प्राचीन पटखेळांचे अवशेष

Bhairavnath Temple : प्राचीन खेळ संवर्धन मोहिमेंतर्गत सध्या राज्यात प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध सुरू आहे.

सुनील शेडगे

जिल्ह्यात प्रथमच सापडलेले प्राचीन पटखेळांचे अवशेष ही आनंददायी गोष्ट आहे. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. जो प्राचीन भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा आहे.

सातारा : वाई तालुक्यातील किकली येथील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिरात (Bhairavnath Temple) प्राचीन पटखेळांचे अवशेष सापडले आहेत. नाशिकचे पुरातत्त्वज्ञ सोज्वळ साळी अन् साताऱ्यातील अभ्यासक साक्षी महामुलकर यांचे संशोधन त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले आहे.

प्राचीन खेळ संवर्धन मोहिमेंतर्गत सध्या राज्यात प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध सुरू आहे. इतिहासात प्राचीन काळी मनोरंजनासाठी विविध खेळ खेळले जात असत. पचीसी, चतुरंगसारख्या कित्येक बैठ्या खेळांचा उगम भारतात झाला. समृद्ध प्राचीन व्यापारामुळेही काही खेळ आपल्या देशात आले. आजही त्यांचे कोरीव अवशेष प्राचीन लेणी, मंदिरे, घाट अशा ठिकाणी पाहावयास मिळतात.

राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, वेरूळ आदी ठिकाणी प्राचीन व्यापारी मार्गांच्या खुणा प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यात आता सातारा जिल्ह्यातील किकली गावची भर पडली आहे. येथील प्राचीन भैरवनाथ मंदिरात एकूण सात पटखेळांचे पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले आहेत. नवकंकरी, वाघ- बकरी, पंचखेलिया अष्टचल्लस या प्राचीन बैठ्या खेळांचा त्यात समावेश आहे. प्राचीन इजिप्त, रोम, नेपाळ, सिलोन या ठिकाणी अशा खेळांचे उगम, संदर्भ सापडतात.

या प्रांतातून आलेल्या व्यापाऱ्यांनी इथे हे खेळ कोरून ठेवल्याचे दिसते. नव्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे कऱ्हाडसह वाईचा भाग हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन व्यापारी मार्ग होता. यालाही दुजोरा मिळत आहे. या खेळांचे दस्तावेजीकरण व नोंद झाली असून, साताऱ्याच्या इतिहासात ही मोलाची भर मानली जात आहे.

भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळाचे अवशेष मिळाले आहेत. अजूनही आणखी अवशेष मिळण्याची शक्यता आहे. या बाबींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभाग, स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ आदींचा पुढाकार आवश्यक आहे.

-सोज्वळ साळी, पुरातत्त्वज्ञ

जिल्ह्यात प्रथमच सापडलेले प्राचीन पटखेळांचे अवशेष ही आनंददायी गोष्ट आहे. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. जो प्राचीन भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा आहे. त्याचे जतन, संवर्धन गरजेचे आहे.

-साक्षी महामुलकर, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT