सातारा

काेविडच्या लढ्यासाठी शाहूपुरीतील सेवानिवृत्त शिक्षिकेचे पन्नास हजारांचे याेगदान

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सद्यस्थितीत संपूर्ण जगाला हादरवून सोडणा-या कोरोनासारख्या गंभीर संकट काळात दिवसेंदिवस वाढणा-या रुग्णसंख्येमुळे शासकीय, खासगी दवाखाने, खासगी स्वरुपात उभी केलेली कोरोना केअर सेंटर्सही अपुरी पडू लागली आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. ऑक्‍सिजन सुविधा, व्हेंटिलेटर अभावी कितीतरी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत व कितीतरी रुग्ण आपल्या घरीच किंवा रुग्णालयाच्या दाराशी मृत्यूशी झुंज देत आहेत हे दररोज वर्तमानपत्रातून आपल्यासमोर येत आहे.

या कठीण परिस्थितीत काही सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन घरच्याघरी असणा-या रुग्णांना ऑक्‍सिजन मशिन अभावी आपला जीव गमवावा लागू नये म्हणून संबंधितांच्या नातेवाईकांना मोफत ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशिन उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत.या कार्यात पुढाकार घेतलेल्या शाहूपुरी ग्रामविकास आघाडी व कट्टा ग्रुपसारख्या सामाजिक संघटनांनी अशा प्रकारचे मशिन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला होता.

नवरात्राेत्सव रद्द करुन 'धर्मवीर'चा कोरोनाबाधितांसाठी झटण्याचा निर्णय

त्याला सहकार्य म्हणून जिल्हा परिषद कॉलनी शाहूपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती रत्नमाला विजयसिंह भोसले यांनी आपल्या वयाच्या 76 व्या वर्षातही समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या संघटनांना आपले पती (कै.) विजयसिंह भोसले यांचे स्मृतिप्रीत्यर्थ स्वतःच्या पेन्शनच्या रक्कमेतून पन्नास हजार रुपये पर्यंतच्या दोन ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशिन संघटना प्रतिनिधींकडे नुकतेच आपल्या नातवंडांचे हस्ते सुपुर्द केली.

श्रीमती भोसले यांनी दोन मशिन देऊन कोरोना योध्यांना एकप्रकारे बळचं दिले आहे. त्याचबरोबर नव्या पिढीला प्रत्यक्ष कृतीतून दातृत्वाचा संस्कारही देण्याचा प्रयत्नही केला. यापूर्वीही श्रीमती भोसले यांनी शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या उभारणीतही वेळोवेळी आपल्याजवळील असणारी पुंजी ऐन आर्थिक संकटात मदत स्वरुपात देऊ केली होती व आजही करीत आहेत. किंबहुना त्यांच्या या असामान्य त्यागावरचं आजचे हे विद्यालय उभे आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही अशी भावना संस्थेचे सदस्यांची आहे.

काेविडच्या मुकाबल्यासाठी 'रयत'चे दातृत्व; मुख्यमंत्री निधीस दोन कोटी 75 लाख

श्रीमती भोसले यांचे हे सामाजिक कार्यातील योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही अशा शब्दांत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते व कट्टा ग्रुपचे संकेत परामणें यांनी आपल्या भावना व्यक्त करुन या दातृत्वभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी श्रीमती रत्नमाला भोसले यांनी पैसा येईल - जाईल परंतु, आजच्या घडीला आपल्या समाजबांधवांच्या जिवित रक्षणासाठी शक्‍य ती मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजते. या मशिन्सचा उपयोग एका जरी रुग्णाला झाला तर हेच माझ्यासाठी समाधान असेल अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी भारत भोसले, ग्रामपंचायत सदस्या शोभा केंडे, माधवी शेटे , जगदीश भोसले, अभय भोसले, सुरेश शेटे, भैय्या पाटणे, धनंजय खोले, अजय भोसले, आशुतोष भोसले, अथर्व भोसले , निशांत केंडे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब म्हणतात, वयाच्या सत्तरीतही मी कोरोनाला गाडून आलो!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT