rickshaw sakal
सातारा

Rickshaw Driver : रिक्षाचालकांचे तहसीलकडे हेलपाटे; निवडणुकीतील रिक्षांचे मिळेनात पैसे

लोकसभा निवडणुकीत दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय रिक्षांची सोय करण्यात आली होती.

प्रशांत घाडगे

सातारा - लोकसभा निवडणुकीत दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय रिक्षांची सोय करण्यात आली होती. या रिक्षांना दिवसभरासाठी दीड हजार रुपये दिले जाणार होते. आता निवडणुका होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी रिक्षाचालकांना पैसे मिळाले नाहीत. याबाबत रिक्षाचालकांनी संबंधित विधानसभेच्या निवडणूक शाखेशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने विविध पातळीवर जोरदार तयारी केली होती. मतदारसंघनिहाय उपक्रम राबविण्यात आले होते. मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.

यामध्ये दिव्यांग व्यक्तींना मतदार केंद्रापर्यंत येण्यास अडचण येणार असल्याने निवडणूक विभागाने विधानसभानिहाय रिक्षा नेमून दिव्यांगांची सोय केली होती. त्यामध्ये प्रतिरिक्षाला दीड हजार रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी या कामकाजासाठी असणाऱ्या रिक्षाचालकांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यावर संबंधित रिक्षाचालकांचे नाव, रिक्षा क्रमांक लिहून घेण्यात आला आहे.

मात्र, आता निकाल लागून दीड महिन्याचा कालावधी गेला तरी रिक्षाचालकांना पैसे मिळाले नाहीत. मागील दोन महिन्यांत रिक्षाचालक सतत संबंधित तहसील कार्यालयात हेलपाटे मारूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. या प्रकाराबाबत आम्हाला कष्टाचे पैसे मिळावेत, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.

पासबुक कशी गोळा करणार?

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काही रिक्षाचालकांनी विधानसभानिहाय नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना संपर्क केला असता फाइल तयार असून, आठवडाभरात पैसे मिळतील, अशी उत्तरे देण्यात आली होती. आता मागील आठवड्यात रिक्षाचालकांनी फोन केला असता सर्वांनी एकत्र येऊन पासबुक जमा करा मगच पैसे देतो, असे सांगण्यात आले. यावर मतदारसंघातील सगळ्या रिक्षाचालकांची पासबुक प्रशासकीय पातळीवर संबंधित यंत्रणेने गोळा केली पाहिजेत. ही पासबुक आम्ही कशी गोळा करणार? असा प्रश्‍न रिक्षाचालकांना पडला आहे.

निवडणुकीच्या काळात दिव्यांग व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी दीड हजार देणार असल्याचे पत्र आम्हाला दिले होते. त्यानुसार आम्ही दिवसभर दिव्यांग व्यक्तींना केंद्रापर्यंत पोचवून त्यांच्या अडचणी दूर केल्या. मात्र, आता मतदान होऊन दोन ते अडीच महिने झाले तरी पैसे देत नाहीत. याबाबत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.

- एक रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT