सातारा

वाचनप्रेमींनाे! साताऱ्यात उद्यापासून "ग्रंथोत्सव'; सवलतीच्या दरात नामवंत लेखकांच्या पुस्तकांचा खजाना

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : सातारकर आणि परिसरातील वाचनप्रेमींसाठी "सकाळ प्रकाशन' एक आनंद पर्वणी घेऊन आले आहे. सोमवारपासून (ता. 15) बलशेटवार बुक सेलर्स, मोती चौक व पोवई नका येथे, सकाळ प्रकाशन व बलशेटवार बुक सेलर्स आयोजित "ग्रंथोत्सव' हे सकाळ प्रकाशनाच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन भरत आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन सुरू राहील. वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.
 
या "ग्रंथोत्सवा'चे उद्‌घाटन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता बलशेटवार बुक सेलर्स, मोती चौक येथे होईल. साताऱ्यातील पुस्तक प्रेमी वाचकांनी उपस्थित राहून या समारंभाची शोभा वाढवावी, असे आवाहन "सकाळ प्रकाशन' व "बलशेटवार बुक सेलर्स' यांनी केले आहे. 

धमाकेदार सवलत 

शेती, अध्यात्म, तत्त्वज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, माहितीपर, अर्थविषयक, पालकत्व, स्पर्धा परीक्षा, वैचारिक ललित अशा विविध प्रकारची पुस्तके आकर्षक 25 टक्के सवलतीत प्रदर्शनस्थळी उपलब्ध असतील. याखेरीज रुपये 1500 आणि त्यापुढील पुस्तक खरेदी करणारे वाचक, वाचनालये व अन्य संस्थांसाठी 40 टक्के सवलत अशी धमाकेदार योजना जाहीर करण्यात आली आहे. 

पुण्याला जाताना तुम्हालाही असा अनुभव आलाय, तर आम्हाला जरुर कळवा..

नामवंत लेखक 

या पुस्तक प्रदर्शनात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जगन्नाथ दीक्षित, शशी थरूर, जयराम रमेश, शिवराज गोर्ले, मंगला गोडबोले या नामवंत लेखकांबरोबरच प्रताप चिपळूणकर, डॉ. प्रशांत नाईकवाडी, डॉ. नितीन मार्कंडेय, तेजस शेंडे, दिलीपराव देशमुख बारडकर अशा कृषी तज्ज्ञांची पुस्तकेही समाविष्ट आहेत. 

सातारा आणि परिसरातील सर्व वाचन प्रेमी, वाचनालये, शालेय व महाविद्यालयीन संस्था आणि इतर शासकीय व खासगी संस्थांनी ग्रंथोत्सवाला भेट देऊन या पुस्तक पर्वणीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नदीम रावल (7776045556) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंगापूर वंदनच्या सरपंचपदी वर्षा कणसे; ग्रामविकासचे 11 उमेदवार मताधिक्‍याने विजयी

पाहा Video : सरंमजामशहांची 16 आणेवारीची रद्द करा; बेमुदत ठिय्या आंदाेलन सुरु

अमिर खानावर कारवाई केलेले हवालदार संजय साबळे पुन्हा चर्चेत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT