Akshay Maharaj Bhosale sakal
सातारा

Sant Tukaram : संत तुकाराम महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही; अक्षयमहाराज भोसले

श्री संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारत असे म्हणून ते देवावर प्रेम करु लागले असे वादग्रस्त विधान धर्मेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर महाराजांनी केले

रुपेश कदम :

दहिवडी : संत श्री तुकाराम महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही असा इशारा धर्मवीर अध्यात्मिक सेना (बाळासाहेबांची शिवसेना) कार्याध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी दिला.

श्री संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारत असे म्हणून ते देवावर प्रेम करु लागले असे वादग्रस्त विधान धर्मेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर महाराजांनी केली आहे. यावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत अक्षयमहाराज भोसले यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, समाजाला अंधश्रद्धेपासून दूर लोटून भक्तीच्या मार्गावर आणणारे संत म्हणजे श्री तुकोबाराय. आईसाहेब जिजाई यांचे इतकी थोर पतिव्रता पाहता येणे दुर्मिळ.

आयुष्यभर आपल्या पतींने भोजन केल्याशिवाय ज्या माऊलीने भोजन केलं नाही. त्या माऊली विषयी बोलताना संबंधितांनी मर्यादा बाळगली पाहिजे होती. ज्यांना देव प्रथम भेट देतो त्या संतवर्य जिजाई आईसाहेबांचा अधिकार खूप मोठा होता.

त्यांच्याबद्दल चुकीचे विधान करणे हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. संत श्री तुकाराममहाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. मग समोरचा व्यक्ती कोणी असो. धीरेंद्र शास्त्रीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे अक्षयमहाराज भोसले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT