सातारा

सकारात्मक मन ठेवल्यास कोरोना हरताे : सारिका मिठारे

राजेंद्र शिंदे

खटाव (जि. सातारा) : शासकीय दवाखान्यातून दिलेली औषधे नियमित घेतल्यामुळे तसेच रोज सकाळी योग, पुरेसा व्यायाम करत मनाची तयारी सकारात्मक ठेवल्याने आणि शेजारी-पाजारी लोकांचा पाठिंबा असल्यामुळे आमचे सर्व कुटुंब या विपरित परिस्थितीतून बाहेर पडले असे सारिका मिठारे (वडी, ता. खटाव) यांनी नमूद केले. 

सारिका म्हणाल्या, माझे 70 वर्षीय सासरे बेलाजी मिठारे यांना प्रथम कोरोनाने गाठल्याचे समजताच गलितगात्र झाले. पण, हिंमत हरले नाहीत. त्यांच्यासाठी प्रथम मायणी (ता. खटाव) येथील रुग्णालयात ऑक्‍सिजन बेड शिल्लक नसल्याने मग आम्ही त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करायचे ठरवले. परंतु, तिथेही बेड शिल्लक नसल्याने आमची पाचावर धारण बसली. सातारा येथे प्रतिभा हॉस्पिटलमध्ये आमचे दीर व पती यांच्या अथक प्रयत्नामुळे एक ऑक्‍सिजनयुक्त बेड मिळाला. तेथे त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे लवकरच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवू लागली. परंतु, नियतीने मांडलेला खेळ आम्हाला समजला नाही. माझ्या सासऱ्यांना लागण झाल्यानंतरच्या दहाव्या दिवशी आम्हा घरातल्या हायरिस्कमधील सर्वांची तपासणी केली असता माझा रिपोर्ट पोझिटिव्ह आला आणि माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबात अचानक वादळ उभे राहिले. कारण स्री म्हणून मी एकटीच माझ्या घरात सर्वांची काळजी घेताना चक्क मलाच कोरोनाने गाठले आणि आता यक्षप्रश्न समोर उभा ठाकला, तो स्वयंपाक बनवण्यापासून ते माझ्या आठ वर्षीय मुलाला भरवण्यापर्यंतचा.

गुन्हेगारी माेडीत काढणे हेच माझे ध्येय : आंचल दलाल
 
मला तर आभाळ कोसळल्यासारखे वाटले. सासऱ्यांच्या खोलीची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याच्या नादात मी स्वत: या महाभयंकर रोगाच्या विळख्यात सापडले होते. या अगोदर कधीही आमच्या लहानशा वडी या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव नसताना माझ्याच घरात माझे सासरे आणि नंतर मी अशा प्रकारे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने गावातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळाच झाला. पण, आमचा ग्रामीण भाग असल्याने व गावातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे माझ्या पतीच्या व लहान मुलांच्या जेवणाचा कसलाही अडथळा किंवा चिंता मला जाणवली नाही.

मैत्रीच्या विश्वासावर निवडणूक ठामपणे लढवली आणि जिंकलीही : श्रीनिवास पाटील

माझ्या पूर्वजन्मीची पुण्याई असो अथवा माझ्या सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद पण कोरोनाबाधित असल्याच्या कालावधीत माझ्या घरातील माझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना कोणत्याही व्यक्तीला आपण या दुर्धर व्याधीने ग्रस्त असल्याचा भाससुद्धा झाला नाही. आजारातून व्यवस्थित बाहेर पडून पुन्हा आपण संसारामध्ये गुरफटायची स्वप्ने पाहतच होते. तोपर्यंत माझ्या दोन्ही मुलांना कोरोना झाल्याचा रिपोर्ट आला आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT