सातारा

Karad Accident : तांबवे फाट्यावर भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

Latest Karhad News: एसटी चालकांच्या प्रसंगावधानामुळे दुचाकी बचावला, मात्र अॅपे रिक्षाचे नुकसान झाले.

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

Latest Satara News: कऱ्हाड ते पाटण रस्त्यावरील तांबवे फाटा येथे काल रात्री झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एकजण ठार झाला.राजेंद्र पांडुरंग चव्हाण (वय- 60, रा. साजूर, ता. कराड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तिघेजण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे वाहतूक काही खोळंबली होती. साजूरहून कऱ्हाडला वाढदिवसाला जाताना अपघात झाला.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कऱ्हाड - पाटण रोडवर शिवसमर्थ पंतसंस्थेच्या समोर बुलेट (एमएच- 50- जे- 7080) आणि दुसरी दुचाकी (एमएच- 11- एए- 7313) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात बुलेटवरील राजेंद्र चव्हाण यांचा मृत्यू झाला. अन्य ओंकार अकुंश पाटील, रणजित जगन्नाथ पाटील (रा. साजूर) आणि अजित जगदीश सांळुखे (रा. काले) तिघे जखमी आहेत. जखमीवर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींची माहिती घेत त्यांना धीर दिला. तसेच कोणताही गोंधळ न घालता, वाहनांना वाट करून दिली. तसेच साजूर गावातील लोकांना अपघाताची माहिती देत अवघ्या 10 मिनिटात मदत केली. साकुर्डीचे उपसरपंच विश्वासराव कणसे, पोलिस पाटील जयदीप देवकर, सुनिल पाटील, संदीप साळुंखे, किसन थोरात, सुरेश शिंदे, अतिश कणसे यांच्यासह व्यापारी आणि साकुर्डी गावातील तरूणांनी मदत केली.

तांबवे फाटा आणि साकुर्डी गाव हद्दीत 500 मीटर अंतरात काल बुधवारी एका दिवसात दोन अपघात झाले. यामध्ये साकुर्डी येथे एसटी चालक दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी गेला असता त्यांची धडक उभ्या असलेल्या अॅपे रिक्षाला बसली. यामध्ये एसटी चालकांच्या प्रसंगावधानामुळे दुचाकी बचावला, मात्र अॅपे रिक्षाचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT