satara agent for private travel vehicles st women scheme karad esakal
सातारा

Satara News : खासगी एजंटांकडून एसटी प्रवाशांची पळवापळवी

जिल्ह्यातील स्थिती; बस स्थानकात येऊन आमिष दाखवण्याचा प्रकार

हेमंत पवार

कऱ्हाड : सुटीसह लग्न कार्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढली आहे. त्यातच शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, तिकीट दरात ५० टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना यासह अन्य सवलतीच्या योजना सुरू केल्या आहेत.

त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढतच आहे. महामंडळाला चांगला महसूलही मिळत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांतील प्रवाशांची संख्या रोडावत आहे. त्यामुळे खासगी वाहनचालकांनी प्रवासी मिळावे, यासाठी काही एजंट नेमले आहेत.

त्यांच्याकडून गेल्या महिन्यापासून थेट बस स्थानकात जाऊन प्रवाशांना आमिषे दाखवून खासगी वाहनांकडे नेण्याचे प्रकार होत आहे. जिल्ह्यातील अनेक बस स्थानकांतून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हा प्रकार सुरू असूनही अशा खासगी एजंटावर कारवाई होत नसल्याने ते आता निर्भीड बनले आहेत.

अशी आहे वस्तुस्थिती

  • एसटी बस स्थानकातून राजरोसपणे नेले जातात प्रवासी

  • एसटीचे प्रवासी वाढल्याचे घेतला जातोय फायदा

  • एजंट शोधतात शनिवार, रविवार व सुटीचा मोका

  • प्रवाशांना दाखवले जाते एजंटाकडून कमी पैशाचे आमिष

  • नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचेच राहिले नाही एजंटावर नियंत्रण

  • एसटी महामंडळाकडूनही ठोस कारवाईच नाही

  • अनेक आगारांकडे नाहीत सुरक्षा रक्षक

नादुरुस्त एसटीमुळेही घट

एसटी महामंडळाकडे असणाऱ्या एसटीपैकी अनेक बस जुन्या झाल्या आहेत. यातील काही बसना १५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचे पुन्हा पासिंग करून त्या बस वापरात आणल्या आहेत. त्यातच प्रवाशांच्या तुलनेत नवीन बसही महामंडळाकडून जिल्ह्यातील आगारांना मिळत नाहीत. जुन्या बस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेही बसचे काही प्रवासी हे प्रवासासाठी खासगी वाहनांना पसंती देत आहेत.

एजंटांवर कोणाचाच नाही वचक

सातारा, कऱ्हाड व जिल्ह्यातील अन्य बस स्थानकांच्या आवारातून एसटीच्या प्रवाशांना खासगी वाहनांचे एजंट पळवून नेतात. खासगी एजंटांचा बंदोबस्त करण्यास एसटी कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकही अपयशी ठरत आहेत. संबंधितावर कोणताही वचक न राहिल्याने ते थेट बस स्थानकात जाऊन प्रवाशांची पळवापळवी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT