लोणंद (जि. सातारा) : नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील यांच्यावरील अविश्वास ठराव काल 12 विरुद्ध एक मताने फेटाळल्याने श्री. शेळके- पाटील हे नगराध्यक्षपदी कायम राहिले. त्याबद्दल आनंदराव शेळके- पाटील यांनी त्यांचा व योगेश क्षीरसागर यांचा सत्कार केला.
नगरसेविका स्नेहलता शेळके, मेघा शेळके, कुसूम शिरतोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सत्कारावेळी आनंदराव शेळके म्हणाले, ""आमदार मकरंद पाटील यांनी येथे विकासापेक्षा घराघरांत, गावागावांत व जातीपातीत भांडणे लावण्याचे काम केले. गेल्या काही वर्षांपासून सामान्य नागरिकांना न पेलवणारे राजकारण ते करत आहेत. परिणामी लोणंद शहर विकासापासून मागे गेले आहे. मीपणा आणि पैशानेच सर्व होते यास छेद देणारी ही घटना आहे.'' तालुक्यातील ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे, रमेश धायगुडे, अनुप सूर्यवंशी, राजेंद्र नेवसे, शोभा जाधव, अशोक धायगुडे आदी नेते व कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचे काम ते रात्रंदिवस करत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे या अविश्वास ठराव प्रक्रियेमुळे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष सचिन शेळके म्हणाले, ""आनंदराव मामांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. माझ्याबाबत नागरिकांमध्ये चुकीचे गैरसमज पसरवून नगराध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी केलेल्या दळभद्री प्रयत्नांना योगेश क्षीरसागर यांनी चोख उत्तर दिले आहे. यापुढेही आनंदराव मामांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन पारदर्शक कारभार करणार आहे.''
योगेश क्षीरसागर म्हणाले, ""आनंदराव मामांच्या माध्यमातून नगरपंचायतीत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक कामे करता आली. अलीकडे आमच्यातील दुराव्याचा अनेकांनी फायदा घेतला. मात्र, नगराध्यक्षांना सहकार्य केल्याचे मोठे समाधान आहे. यापुढच्या काळात त्यांच्याबरोबरीने जोमाने काम करण्याचा निर्धार आहे.'' युवा नेते हर्षवर्धन शेळके यांनी आभार मानले.
या वेळी खंडाळा पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव धायगुडे, बाजार समितीचे संचालक विश्वास शिरतोडे, आप्पासो शेळके, बबनराव शेळके, हर्षवर्धन शेळके, बाळासाहेब केसकर, हिरालाल धायगुडे, संदिप क्षीरसागर, बबनराव ठोंबरे, डी. जी. क्षीरसागर, भरत शेळके, बाळकृष्ण भिसे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.