सातारा : कोरोना संकटकाळात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचखोरीत आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत क्लास वन अधिकाऱ्यांसह 25 जण जाळ्यात अडकले आहेत. सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण महसूल विभागात आहे.
स्थानिक आमदारांना विचारले होते काय....
कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलिस, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, होमगार्ड, तलाठी, पालिकांसह ग्रामपंचायत कर्मचारी आदींचे लाखो हात कोरोना "वॉरिअर्स' म्हणून काम करत असताना काही भ्रष्ट लोकसेवकांनी लाच घेतली आहे. एकीकडे डॉक्टर, नर्स व प्रामाणिक पोलिस जिवाची बाजी लावून कोरोनाशी लढत आहेत, तर दुसरीकडे याच काळात लाच घेऊन स्वतःची घरे भरण्याचे काम काही झारीतील शुक्राचार्य करत आहेत. सातारा लाचलुचपत विभागाने यंदा 20 जुलैपर्यंत सापळे रचून 25 लाचखोरांना अटक केली आहे. त्यामध्ये महसूल विभागाचे अव्वल स्थान असून, पोलिस विभागाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे एका "क्लास वन' अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी या काळात काम करून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी करून अडवणूक करण्यात आली.
गृहमंत्र्यांसमाेर त्याचे गंभीर वर्तन, कदाचित मोठी किंमत मोजावी लागली असती
सर्वसामान्यांसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. महसूल विभागातील सर्वाधिक सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्या खालोखाल पोलिस विभागातील चार जणांना अटक केली आहे. वन विभाग, नगरविकास विभाग, झेडपी व एमएसईबीमधील प्रत्येकी एकावर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवायांत 25 जण जाळ्यात अडकले आहेत.
"क्लास थ्री'मधील लोकसेवकांचे लाचखोरीत प्रमाण जास्त असून, 17 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन "क्लास टू' अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एका "क्लास वन' अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. इतर लोकसेवक एक, तर खासगी तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सातारा लाचलुचपत विभागाने पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक अविनाश जगताप यांच्यासह 15 कर्मचाऱ्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. संकटात सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याचे सोडून त्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी संताप व्यक्त होत आहे.
...तर पुढची 25 वर्षे मराठा समाजाला आरक्षण नाही
अधिकाऱ्यांवरील कारवाई
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नागरिकांचा विश्वास वाढला आहे. शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करीत असेल, तर तत्काळ तक्रार करा. तक्रारदाराचे योग्य काम करून देण्याची जबाबदारी लाचलुचपत विभाग घेईल.
- अशोक शिर्के, पोलिस उपअधीक्षक, सातारा, एसीबी
तक्रारीसाठी साधा संपर्क
लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. 1064 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह दूरध्वनी 02162-238139 येथे संपर्क साधावा, तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता, असे पोलिस निरीक्षक अविनाश जगताप यांनी सांगितले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.