mamurdi bridge system
सातारा

मेढा- महाबळेश्वर रस्त्यावरील पूल खचला; पर्यायी रस्ता वापरा

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : सततच्या पावसामुळे मामुर्डी (ता. जावळी) येथे मेढा- महाबळेश्वर रस्त्यावरील (medha mahableshwar road) पुलाच्या बाजूतील भराव बुधवारी (ता. 2) संध्याकाळी वाहून गेल्याने या मार्गे वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यायी या मार्गावरील वाहतूक अन्य रस्त्याने वळविण्यात आली आहे. गेली दोन दिवस अवकाळी पाऊस पडत असून, सातारा- मेढा- महाबळेश्वर रस्त्यावर चारपदरीकरणाचे काम सुरू आहे. पूल (bridge) बांधण्याचे व रस्त्याची कामे सुरू आहेत. बुधवारी दुपारी पडलेल्या पावसाने ओढ्या नाल्यांना पाणी आले, तर काही ठिकाणी रस्त्याला टाकलेला भरावही खचून गेले आहेत. (satara-breaking-news-mamurdi-bridge-medha-mahableshwar-road-closed)

त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. मामुर्डी गावानजीक असणाऱ्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भराव निघून गेला व मेढा- केळघर- महाबळेश्वर रस्ता पूर्णपणे बंद झाला.

त्यामुळे केळघरला जाणारा रस्ता मेढामार्गे पर्यायी रस्ता मोहाट- म्हाते- सावली अशी वाहतूक वळण्यात आली आहे. करंजे येथील पुलाजवळ सुद्धा असाच भराव खचत आल्याने संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा कामे तत्काळ होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Heavy Rain

दरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.

80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT