सातारा

'मी उदयनराजेंना पाडलेला माणूस, तुम्हालाही संपवल्याशिवाय राहणार नाही'

महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : मी जर एखादी गोष्ट केली असेल तरच केले म्हणा, न केलेल्या कामाचे खापर माझ्यावर फोडू नका, ते मला कधीच मान्य नसेल, असले राजकारण करायचे असते तर शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) ज्यावेळी सातारा जिल्ह्यात आले त्याच वेळी त्यांच्या विरेधात काम केले असते. पण शरद पवार (Sharad Pawar) सांहेबांनी जी दिलेली जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडली होती. कोरोगावच्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता हा शशिकांत शिंदेच्या बरोबरच होता, पालकमंत्री बाळासाहेब पाटील का म्हणत नाहीत की शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendra Raje Bhosale) विरोधात काम केले. जावळीचा विषय आला की दरवेळी माझ्यावर आरोप केले जातात पण मी ते खपवून घेणार नाही, मी दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे, माझे काम सरळ मार्गी आहे, माझे घर राजकारणावर चालत नाही, मी आमदार असलो नसलो मला फरक पडत नाही, पण  माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही असा दमच आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेंना दिल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. दरम्यान यापुर्वी एकदा मी उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale) विराेधातही निवडून आलेलाे आहे हे विसरु नका अशी टिप्पणीही शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या भाषणात केली. 

कुडाळ येथे बुधवारी संध्याकाळी उशिरपर्यंत सुरु राहिलेल्या एका शेतकरी मेळाव्यात शांत संयमी समजल्या जाणा-या शिवेंद्रसिंहराजेंचा पार चढलेला अनेकांनी पाहिला. ते म्हणाले माझी आोळख ही छत्रपतींचा वारसदार आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ठ आहे, मी जे बोलतो तो मी करतोच, आणी जे करतो ते छाती ठोकपणे सांगतो, जावळीचा सर्वांगिण विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे, मी खुन्नशी प्रवृत्तीचे राजकारण कधीच करत नाही, ज्याला माझे पटत नसेल त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे, जे सच्चे आहेत, एकनिष्ठ आहेत त्यांना सोबत घेऊन मी पुढे जाणार आहे. माझ्या जास्त सभ्य व शांत राहण्याचा काहीजण गैरफायदा घेतात पण यापुढे ते चालणार नाही, मी जरी भाजपात असलो तरी माझी राज्याच्या राजकारणात किती ताकद आहे, माझ्या शब्दाला किती किंमत आहे हे मला माहिती आहे व ते मी मतदारसंघात करत असलेल्या कामांवरून दाखवूनही दिले आहे.

माझी स्पष्ट भुमिका आहे. केवळ कामापुरते माझ्याकडे यायचे व मला गरज असली की विरोधकांच्या सोबत फिरायचे हे यापुढे चालणार नाही, टाळी एका हाताने वाजत नसते, नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याचप्रमाणे मलाही माझी राजकीय वाटचाल करणे गरजेचे आहे. मला माझे भविष्यातील राजकीय धोके आोळखून काम करावे लागणार आहे त्यासाठी काही वेळा कटू निर्णयही घावे लागणार आहेत अशी स्पष्ट व सडेतोड भुमिकाही शिवेंद्रसिंहराजेंनी मांडली. 

गट-तट, पक्षीय भूमिका बाजूला ठेवत ग्रेड सेपरेटरचा ताबा घ्या; रामराजेंचे सातारा पालिकेस आवाहन

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, पंचायत समिती उपसभापती सैारभ शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.   


भाजपात गेलो म्हणून काय चुक झाली

पक्ष पक्ष म्हणजे काय, मी भाजपात गेलो म्हणून माझी काय चुक झाली असा सवाल करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले माझ्या काही अडचणी होत्या काही अंतर्गत विषय होते त्यामुळे मला निवडणुकीत अडचणी आल्या असत्या, म्हणून राजकीय धोके आोळखून मला निर्णय घ्यावा लागला. मी भाजपात गेलो तरी मी माझ्या सोबत असणाऱ्या कोणाचेही राजकीय भवितव्य धोक्यात घातले नाही, मी कोणावरही जबरदस्ती केली नाही, राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात, मला माझ्या बरोबर कायम राहतील अशा सर्वांची गरज आहे, त्यांना मी बरोबर घेऊन पुढे जाणार आहे असेही त्यांनी नमूद केले.

ऐषआराम करण्यासाठी हृदया गुप्ताने 81 लोकांना 13 कोटींना फसविले; पुण्यासह नगर, बीड, सातारकरांचा कपाळावर हात

संपादन - सिद्धार्थ लाटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT