सातारा : शहरातील बिगर निवासी मिळकतधारकांना लॉकडाउन (lockdown) कालावधीतील तीन महिन्यांची घरपट्ठी माफ (house tax) करण्याचा निर्णय सातारा पालिकेने (satara muncipal council) विशेष सभेत घेतला होता. या निर्णयानुसार शहरातील सहा हजार 697 मालमत्ताधारकांना सुमारे 71 लाख 57 हजार 13 रुपयांची सुट देण्याची प्रक्रिया पालिकास्तरावर सुरु झाल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्या वतीने देण्यात आली आहे. (satara breaking news udayanraje bhosale exemption house tax muncipal council)
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ कडक लॉकडाउन सुरु राहिल्याने सर्वसामान्यांबरोबरच व्यावसायिकांचे अर्थच्रक धोक्यात आले होते. या काळातील बिगर निवासी मिळकतधारकांची तीन महिने घरपट्टी माफ करण्याचा विषय सातारा पालिकेच्या सभेपुढे ठेवलेल्या विषयाला बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता.
यात बिगरनिवासी तसेच निवासी मिळकतधारकांना तीन महिन्यांची घरपट्टी माफी देण्याची मागणी केली होती. निवासी मिळकतधारकांच्या सवलतीच्या अनुषंगाने सध्या मंत्रालयीनस्तरावर कार्यवाही सुरु असल्याचेही उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे. निवासी मिळकतधारकांना घरपट्टी माफी देण्याचा निर्णय होईपर्यंत नगरपरिषद कायद्यातील तरतुदींच्या आधारे सन 2020-21 या आर्थिक वर्षातील तिमाही बिगर निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफीची अंमलबजावणी सातारा पालिकेने सुरु केली आहे.
पहिल्या टप्प्यात याचा 6 हजार 697 बिगरनिवासी मिळकतधारकांना फायदा होणार असून त्यांचा सुमारे 71 लाख 57 हजार रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. केंद्राकडून अतिरिक्तनिधी मिळवत प्रशासकीय खर्चात बचत करत घरपट्टीमाफीतून होणारी तुट भरुन काढण्यात येणार असल्याचेही उदयनराजेंनी पत्रकात नमुद केले आहे.
satara breaking news udayanraje bhosale exemption house tax muncipal council
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.