satara collector daughter in Kondwa Anganwadi Jitendra Dudi Anchal Dalal set the ideal Sakal
सातारा

Satara News : जिल्हाधिकाऱ्यांची कन्या कोंडव्याच्या अंगणवाडीत; जितेंद्र डुडी, आंचल दलाल यांनी ठेवला आदर्श

विघ्नहर्ता कॉलनीत अन्नप्राशन विधी उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

सातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सातारा दोन अंतर्गत कोंडवे विभागातील विघ्नहर्ता कॉलनी येथील अंगणवाडीमध्ये बालकांचा अन्नप्राशन विधी उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मुलीस पूरक पोषण आहार देण्यात आला. त्यांची मुलगी ख्वाब हिचे नावही कोंडवे येथील अंगणवाडीत दाखल करण्यात आले आहे.

बालकाच्या सर्वांगीण विकासात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचा वस्तुपाठ आज जिल्हाधिकारी डुडी आणि आंचल दलाल त्यांच्या कुटुंबाने घालून दिला. कार्यक्रमास महिला व बाल विकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, पर्यवेक्षिका उमा साळुंखे, सुलभा मिसाळ, मानसी संकपाळ, कोंडवेच्या सरपंच वैशाली निंबाळकर, सीमा जाधव, डॉ. जाधव, डॉ. महिमा पंडित, ग्रामसेवक लोहार आणि महिला उपस्थित होत्या.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत कोंडवे विभागातील विघ्नहर्ता कॉलनी येथील अंगणवाडी केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बालकाला पहिले सहा महिने यशस्वी स्तनपान दिल्यानंतर त्याला पूरक पोषण आहार देण्यास सुरुवात केली जाते. ते करताना आता अन्नप्राशन विधी अंगणवाडीमध्ये साजरा केला जातो.

बालकाच्या सर्वांगीण विकासामध्ये केवळ माताच नव्हे, तर कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग असला, तर ही बाब बालकाच्या विकासास अधिक पूरक ठरते, हे लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डुडी यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. सरकारी उपक्रमांचा केवळ डांगोरा न पिटता स्वतः त्यामध्ये सहभाग घेण्याचा एक आदर्श वस्तुपाठ जिल्हाधिकारी यांच्या कुटुंबाने या कृतीतून आज समाजासमोर ठेवलेला आहे. अंगणवाडी सेविका जयश्री निंबाळकर, मदतनीस भारती निंबाळकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

सर्वसामान्यांच्या मुलांमध्ये मिसळल्यानंतर मुलांमध्ये सामाजिक संबंध चांगले राहतात. त्याचप्रमाणे आमची मुलेही मिसळावेत, यासाठी आम्ही जाणीवपूर्वक अंगणवाडीत मुलीला घातले आहे.

- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT