सातारा

सायंकाळी अनलाॅक झालेला सातारा पुन्हा रात्री झाला लाॅक; जिल्ह्यात हेच राहणार सुरु

सिद्धार्थ लाटकर

सातारा : साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (रविवार) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सर्व मार्केट, दुकाने सुरु करण्याचा आदेश काढल्याने दहा दिवसांपासून लाॅकडाउनमध्ये असलेला सातारा जिल्हा काही प्रमाणात अनलाॅक झाला हाेता. मात्र रात्री आठच्या सुमारास पुन्हा नव्याने सर्व मार्केट, दुकाने एेवजी केवळ माेजकेच व्यवहार सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी सिंह यांच्या सहीनिशी बाहेर आला. यामुळे उद्यापासून (साेमवार) 31 जुलैपर्यंत अत्यावश्‍यक सेवेतील किराणा दुकाने, मटण, चिकन व अंडी विक्री तसेच अडत भाजी मार्केट, फळ विक्रेते, आठवडी बाजार, सकाळी नऊ ते दोन यावेळेत सुरू राहणार आहेत. 

सातारा जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा सर्व किराणा दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दाेन वाजेपर्यंत सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (शिवभोजन थाळी, वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स स्टाफ नर्स साठी यांचे निवासकामी असलेली हॉटेल, इन्स्टिटयुशनल कॉरंटाईन साठी घेतलेले हॉटेल व इतर इमारती वगळून) रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना, तसेच मदयाची घरपोच सुविधा चालू ठेवणेस परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलवरुन मार्गविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा तसेच हाॅटेल रेस्टॉरंट यांचेमार्फत देणेत येणारी घरपोच सेवा सुरु राहील. सार्वजनिक, खासगी क्रिडांगणे, मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वाॅक करणेस प्रतिबंध राहील. सर्व केश कर्तनालय, सलुन,स्पा, ब्यूटी पार्लर दुकाने संपुर्णतः बंद राहतील.

हेही वाचा -  हा आदेश झाला रद्द  हा आदेश झाला रद्द  हा आदेश झाला रद्द 

सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा, आडत भाजी मार्केट, फळे विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री हे दुपारी दाेनपर्यंत चालू राहतील. शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील, तथापि अत्यावश्यक सेवेनील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करिता व वैदयकीय कारणास्ताव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापरास परवानगी राहील, 

सार्वजनिक प्रवासी वाहतूकीतील एसटी बस ही अत्याश्यक सेवेच्या खाजगी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व परवानगी घेऊन चालू असलेल्या उदयोगातील अधिकृत कर्मचारी यांचेसाठी परवानगी राहील. तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक असलेल्या उपाययोजनांचे काम करणारे सातारा जिल्ह्यातील महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी कर्मचारी तसेच राज्य व केंद्र विभागाचे विनिर्दीष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक वस्तु यांचा घाऊक स्वरुपात पुरवठा करणारी वाहतुक सदरच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. सर्व प्रकारची खाजगी बांधकाम्, कन्स्ट्रशनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. तसेच शासनाची शासकीय कामे चालू राहतील. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलरतरण तलाव करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र प्रेक्षागृह, सभागृह संपुर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील, मात्र 14 जूलै पुर्वी परवानगी घेण्यात आलेले खासगी जागेतील व मंगल कार्यालयातीन लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येतील

सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील. धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील, तथापि, सर्व धार्मिक स्थळ / सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.ई काॅमर्स  सेवा उदा. AMAZON, FLIPKART व यासारख्या तत्सम सेवा चालू राहतील. दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी 10 पर्यंत करता येईल. सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी निगडीत सेवा आस्थापना पशुचिचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरु राहतील. कोणतही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेवून रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. . 

सर्व मेडीकल दुकाने सकाळी 9 ते दु. 2 या वेळेत चालू रहतील, तथापि, ऑनलाईन औषध वितरण सेवा व हॉस्पिटल संलग्न औषधांची दुकाने 24 तास कालावधीकरीता सुरु राहतील. सर्व न्यायालये, व राज्य शासनाचे/केंद्र शासनाने कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम चा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने स्वत:चे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.

पेट्रोलपंप व गॅसपंप सायंकाळी सहा पर्यंत सुरु राहतील. शासकीय वाहने, वैदयकीय सुविधा पुरवणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहन, कृषी व्यवसायाशी निगडीन सर्व यंत्र व वाहने, कार्यरत असलेले उद्योग व औद्योगिक आस्थापनेशी संबंधित वाहने, सर्व प्रकाशी माल वाहतूक वाहने, वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित वाहने व शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेली वाहने यांना इंधनपुरवठा करावा. याबराेबरच एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरु राहील, निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील. औदयोगिक व अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, अंतरजिल्हा, अंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहील.

दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडिया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण नऊ पर्यंत सुरु राहील. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील. संस्थात्मक अलगीकरण/विलगीकरण व कोविड केअर सेंटरकरीता ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयांच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील. सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गांव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी, एलआयसी कार्यालय किमान मनुष्यबळासह दुपारी दाेन पर्यंत सुरु राहतील. बँकांच्या इतर ग्राहकसेवा (उदा ऑनलाईन, एटीएम इत्यादी सारख्या) सुरु राहतील.

न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी, न्यायाधीश, वकील, शासकीय केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा, कर्मचारी, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा- कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे व औषधाचे दुकान, खते, व गॅस वितरक पाणी पुरवठा, आरोगय व स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन सेवा, जलनि:सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्यादरम्यान करावयाची अत्यावश्यक काम करणारे, वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, पोस्ट विभागाचे कर्मचारी, दुरसंचार विभाग तसेच कंटेन्मेंट झोनरकरीता नियुक्त कर्मचारी यांनाच दुचाकी, चारचाकी (स्वत:करिता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील.  या सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी स्वत:चे कार्यालयात ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांना स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवणे व वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे. या सर्वांना फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वाहन वापरता येईल.

औषध व अन्न उत्पादन सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्यांचे पुरवठादारी नियमानुसार चालू राहतील व यासाठी एमआयडीसी पोर्टल वरुन देण्यात आलेल्या परवानग्या ग्राहय धरण्यात येईल. एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील सध्या चालू असलेले सर्व औदयोगिक आस्थापना चालू राहतील. तसेच या आस्थापनांसाठी जाण्यासाठी आणि परतीसाठी दोन चाकी व चार चाकी वाहन किंवा जिल्हयाबाहेरील कर्मचा-यांसाठी निश्चित केलेल्या बसमधूनचे प्रवासाला परवानगी राहील. (दोन चाकी वाहनांस एक व्यक्ती, चार चाकी वाहनांमध्ये 3 व्यक्ती व बसमध्ये प्रवासी क्षमतेच्या 50% मर्यादेपर्यंत परवानगी राहील) तथापि त्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. यापूर्वी बाहेरील जिल्हयातील कर्मचारी यांची औदयोगिक आस्थापनेसाठी वाहतूक करणेबाबत चालू असलेली वाहन व्यवस्था चालू राहील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तींनाच कामावर उपस्थित राहता येईल.

Video : व्यापाऱ्यांची 'ही' मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार : पृथ्वीराज चव्हाण

सातारा जिल्ह्यात सुरु असलेले राष्ट्रीय प्रकल्प व शासकीय कामे सरु राहतील. माहिती तंत्रज्ञान उदयोग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येतील. शक्य असल्यास WORK FROM HOME चा पर्याय वापरण्यात यावा. मात्र कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. सदर आस्थापनेमधील कार्यरत कामगार अधिकारी संबंधित आस्थापनेच्या एचआर विभागप्रमुख यांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरीता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. कंपनीकडून निर्गमित  करण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस आधिक्षक सातारा व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सादर करावी. तथापि ज्या औद्योगिक आस्थापनेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अधिकारी /कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहता येईल.

शेती व दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन या अनुषंगीक कामे करण्यासाठी मान्यता राहील. कृषी सेवा केंद्र/बि-बियाणे/खते/किटकनाशक दुकाने/चारा दुकाने ही सर्व दुकाने  दुपारी दाेन पर्यंत,चालू राहतील, शेतमालाची कृषी निगडीत प्रक्रिया उदयोग सुरु राहतील. सर्व प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी राहील. सदर आस्थापनेमधील कार्यरत कामगार अधिकारी संबंधित आस्थापनेच्या एचआर विभागप्रमुख यांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरीता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. कंपनीकडून निर्गमित  करण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस आधिक्षक सातारा व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सादर करावी. तथापि ज्या औद्योगिक आस्थापनेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अधिकारी /कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT