सातारा

Video : जुलमी इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी; मेढ्यात कॉंग्रेसचे धरणे आंदाेलन

सकाळ वृत्तसेवा

मेढा (जि. सातारा) : इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसने आज (गुरुवार) येथे जावळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी इंधन दरवाढीचा निषेध करून नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ""देश कोरोनाच्या संकटातून जाताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे. राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे न्याय योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करून जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे.

डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत 125 डॉलरवर असतानाही देशांतर्गत इंधनाचे भाव स्थिर ठेवण्यात त्यांनी यश मिळवले. परंतु, सध्या कच्च्या तेलाची किंमत 25 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊनही पेट्रोल, डिझेल हे प्रति लिटर 90 रुपयांपर्यंत पोचले आहे. मोदी सरकार इंधनाची दरवाढ करून नफेखोरी करत आहे, हा लोकांच्या खिशावर टाकलेला दरोडाच आहे. अगोदरच महागाईने गोरगरीब, सामान्य माणसांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. मध्यवर्गीयांचे देखील कंबरडे मोडले आहे. छोटे व्यावसायिकही इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीस आले आहेत. ही अन्यायी, जुलमी इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी.''



 
या वेळी जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई महाडिक यांनीही केंद्र शासनाच्या भूमिकेचा कडक शब्दात धिक्कार केला. या वेळी उपाध्यक्ष मालनताई परळकर, मनोजकुमार तपासे, दत्तात्रय धनावडे, शरद मोरे, संदीप माने, अमित जाधव, विक्रांतसिंह चव्हाण, विशाल पवार, गणेश शिंदे, संतोष डांगे, दिलीप शिर्के, रोहन शेलार व कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार शरद पाटील यांना याबाबतचे निवेदन डॉ. सुरेश जाधव, विराज शिंदे यांनी दिले.

मोठी बातमी! जामिनावर सुटलेल्या कैद्यांबाबत उच्च न्यायालयानं 'ही' गोष्ट केली अमान्य; वाचा सविस्तर बातमी.. 

अजित पवारांचे खटक्याव बाेट जाग्यावर पलटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT