NCP-BJP esakal
सातारा

सातारा : 'काँग्रेस भाजपवर गुन्हे दाखल करणार'

केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ काढला आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव वापरलेले नाही. केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने (bjp) अर्थाचा अनर्थ काढला आहे. देशाचे प्रधानमंत्री हे आदरणीय व्यक्तिमत्व असून त्यांची जनमाणसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजपाने केला. यासाठी प्रदेश काँग्रेस(Congress) कमिटी ओबीसी विभागातर्फे भाजपचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्री. माळी म्हणाले, भाजपने ओबीसींचे आरक्षण पुर्णपणे संपवले आहे. भाजपचे राम कदम, आशीश शेलार यांनी महिलांच्या बाबतीत काय वक्तव्य केले हेही बघणे महत्वाचे आहे. त्यातुन भाजपची संस्कृती दिसुन येते. देशाची संपती विकायला लागले आहेत. ते देश विकतील अशी स्थिती आहे. भांडवलदारांचे १५ लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले आहे. शेतकऱ्यांना, गरीबांना द्यायला पैसे नाहीत अशी स्थिती आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपने हा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचा आम्ही कॉंग्रेस ओबीसी विभागाकडुन निषेध करत आहोत.

त्याचबरोबर भाजपचे अनिल बोंडे यांनी पटोले यांच्या विरोधात भयानक स्टेटमेंट केले आहे. त्यांनी त्यांची लायकी काय हे पहावे. त्यांच्या विरोधात राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्या अटकेची मागणी करत आहोत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सर्वासाठी लिहले असून भाजपा जवळ कुठलेही विकासाचे मुद्दे नाहीत. ओबीसी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाला भारी पडत असल्यामुळे त्यांच्या पायाखालील जमीन सरकली. बोंडे यांनी तोंड आवरावे. आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत. भाजपच्या नेत्यांनी तोंड आवरावे, अन्यथा त्यांना योग्य ते उत्तर आम्ही देवु. आज नगरपंचायतीतील स्थिती भाजपने बघावे. आज अनेक ठिकाणी कॉंग्रेस व मित्र पक्षांना चांगले यश मिळाले आहे. त्याचाही राग भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT