Satara 
सातारा

मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतू लागल्याने माणदेशात सामान्यांना भरली धडकी, का ते वाचा

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : सर्वत्र कोरोनाबाधित रुग्ण सापडत असताना माणमध्ये रुग्ण सापडला नसल्यामुळे माणदेशी जनतेने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, चाकरमानी गावाकडे परतू लागले अन्‌ काही दिवसांतच हे चित्र पालटले. कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले तसेच आता स्थानिकही कोरोनाबाधित सापडू लागल्याने माणची स्थिती धोकादायक बनली असून, सामान्यांना धडकी भरू लागली आहे. 

मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कोरोनापासून कोसो दूर असलेल्या माणमध्ये प्रशासन व सामान्य नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कमालीची काळजी घेतली. मात्र, जसजसे दिवस पुढे जावू लागले तसतशी यात ढिलाई जाणवू लागली. सामान्य जनता घरी बसून कंटाळली तर कायदा मोडणाऱ्यांवर कारवाया करून प्रशासन थकले. 

गुजरातहून मुंबईमार्गे कोरोनाने माण तालुक्‍यात प्रवेश केला. 19 मे रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर ठिकठिकाणी मुंबईकर चाकरमानी कोरोनाबाधित सापडू लागले. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच गेली. त्यातच दोन मयत व्यक्तीसुध्दा कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यामुळे मुंबईकरांबाबत विशेष दक्षता घेण्यात येऊ लागली. सर्व कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे होवून घरी आले. स्थानिकांना कोरोनाची लागण न झाल्यामुळे सामान्यांत थोडीशी बेफिकिरी वाढली. काय होत नाही, असे म्हणत म्हणत मोठ्या प्रमाणात लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले तर काळजी घेण्यात हलगर्जीपणा सुरू झाला. 

असे असताना अचानक मागील तीन-चार दिवसांत माणमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडले. मुंबईकरांसोबत प्रथमच स्थानिक रुग्ण सापडू लागल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक रुग्ण सापडत नाहीत, असे म्हणणाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. खोकडे, खांडेवाडी, खडकी-पाटोळे यांसारख्या अतिशय छोट्या गावांमध्ये व दुर्गम भागांसोबतच दहिवडी व म्हसवड या शहरांमध्येही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सामान्य जनता हबकली आहे. 

मार्च व एप्रिलमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. मे मध्ये 14, तर जूनमध्ये 20 रुग्ण सापडले. मात्र, जुलैच्या पहिल्या दिवशीच तब्बल सात रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने माणची स्थिती धोकादायक बनली आहे. गावागावांत नव्हे तर शिवाराशिवारात कोरोनाचीच चर्चा सुरू झाली आहे. आम्हाला काय कोरोना होत नाय म्हणणारे आता काळजी घेतली नाही तर आम्हालाही होऊ शकतो, असे म्हणू लागले आहेत. 

""माणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सामान्य जनतेने घाबरून न जाता वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. योग्य काळजी घेतली तर आपण कोरोनापासून स्वतःसह, कुटुंब, गावाला व तालुक्‍याला दूर ठेवू शकतो.'' 

-डॉ. एम. डी. कोडलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, माण 

माणमध्ये आजवर सापडलेले कोरोनाबाधित 

म्हसवड आठ, दहिवडी सहा, वडजल चार, लोधवडे तीन, शिरताव, भालवडी, दिवड व खडकी-पाटोळे येथे प्रत्येकी दोन, विरळी, परतवडी, तोंडले, राणंद, पिंपरी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द, नरवणे, खोकडे, खंड्याचीवाडी व काळेवाडी येथे प्रत्येकी एक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT