karad 
सातारा

या भागातील कोरोनाग्रस्तांची आर्त हाक... आम्हाला बेड मिळेल का?

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील विविध भागांसह थेट मुंबईहून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे कऱ्हाड शहरातील कोविड हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाली आहेत. येथे तीन कोविड हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळेही संसर्गाचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागातही कोविड हॉस्पिटल सुरू केल्यास कऱ्हाड शहरावरील ताण कमी होण्यास हातभार लागणार आहे. 

कऱ्हाड शहरात कृष्णा हॉस्पिटलला 110, "सह्याद्री'ला 40, तर एरम हॉस्पिटलला 30 कोविड रुग्णांसाठी बेड आरक्षित आहेत. त्या हॉस्पिटलमधील सगळे बेड सध्या हाऊसफुल्ल आहेत. एखादा बाधित रुग्ण आला की, त्याला कोणात्याच हॉस्पिटलला दाखल करून घेता येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. त्याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्‍टर्सनी ती बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. मात्र, अद्यापही त्यावर काहीही उपाय शोधला गेलेला नाही. पालिकेच्या मर्यादा स्पष्ट होत असल्या तरी पालिकेने काही हॉस्पिटल्स्‌ना पत्रेही दिली आहेत. या प्रश्नात जिल्हाधिकारी स्तरावरून लक्ष घालण्याची गरज आहे. 

मुंबईहून शहरामध्ये येणाऱ्या बाधितांची संख्या वाढते आहे. वास्तिवक ते बाधित मुंबईहून निघतानाच थेट हॉस्पिटलमध्ये जादा पैसे भरून आपले बेड बुक करतात. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या रुग्णाला थेट ऍडमिशन मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, कडेपूर, विटा, इस्लामपूर अशा भागातील कोरोनाबाधित रुग्णही येथे दाखल होत आहेत. अर्थात त्यांची इमर्जन्सी असली तरी त्यांना येथे दाखल केल्याने स्थानिक रुग्णांना ऍडमिट कोठे करायचे, हा प्रश्न आहे. पालिका व आरोग्य विभागासमोर हा प्रश्न सोडवायचा कसा, याचे कोडे पडले आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्ण दाखल करून घेण्याबाबतचे अधिकारही त्या-त्या हॉस्पिटलला दिले आहेत. त्यामुळे त्यावरही अंकुश ठेवताना अडचणी येताना दिसतात. 

...असे आहेत उपाय 
- कऱ्हाड तालुक्‍यातील मोठ्या गावांमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करणे 
- कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामीण रुग्णालयांत बाधितांवर उपचाराची सुविधा 
- प्राथमिक आरोग्य केंद्रांनी अधिक सतर्कता ठेवून काम करणे 
- पाटणला कोविड हॉस्पिटल सुरू करणे 
- पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी, तारळेसारख्या मोठ्या विभागात हॉस्पिटल सुरू करणे 

(संपादन ः संजय साळुंखे) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Clock Symbol: 'तो' मजकूर ३६ तासात प्रसिद्ध करा, अजित पवार गटाला निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचे निर्देश

ऑस्ट्रेलिया BGT मध्ये भारताला लोळवेल! रोहितची टीम फक्त १ मॅच जिंकेल; वाचा कुणी केलाय हा दावा?

Vicky Kaushal : विकी कौशलने घेतला पुष्पा 2चा धसका ; छावाची रिलीज डेट बदलणार ?

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे IT शेअर्स तेजीत

Rahul Gandhi : ती भिंत तोडणारच.. ५०% आरक्षणावरुन राहुल गांधींचा घणाघात, संविधान सन्मान संमेलनात केला हल्लाबोल

SCROLL FOR NEXT