सातारा

ग्रामसेवकास शिवीगाळ मारहाण करणाऱ्यास दहा महिन्यांची शिक्षा

गिरीश चव्हाण

सातारा : रांजणी (ता. महाबळेश्‍वर) येथील ग्रामसेवकास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी राजेंद्र बाबूराव रांजणे (वय 38, रा. रांजणी) याला शनिवारी (ता. 3) सातारा येथील न्यायालयाने 10 महिने कैदेची शिक्षा ठोठावली. याबाबतची फिर्याद दुर्योधन बळीराम शेलार यांनी नोंदवली होती. 

शेलार हे रांजणी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते ता. 2 जुलै 2020 या दिवशी ग्रामपंचायतीत आयोजित केलेल्या कोरोनाविषयक बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत येऊन रांजणे यांनी शेलार यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्याची फिर्याद शेलार यांनी मेढा पोलिस ठाण्यात नोंदवली होती. 

त्यानुसार तपास करत मेढा पोलिसांनी सातारा येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. अंतिम सुनावणी झाल्यानंतर रांजणेला 10 महिने साध्या कैदेची शिक्षा अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी सुनावली. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT