दहिवडी (जि. सातारा) : माती बंधाऱ्याच्या कामाच्या बिलाचा चेक (cheque) देण्यासाठी लाच (bribe) स्विकारल्याप्रकरणी माण वन विभागात कार्यरत असलेले वनपाल सुर्यकांत पोळ (रा. दहिवडी, मुळ रा. मार्डी, ता. माण) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (anti corruption bureau) सातारा यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (satara-crime-news-forest-employee-arrested-for-accepting-bribe-anti corruption bureau-raids-in-dhaiwadi)
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी तक्रारदार हे पोट ठेकेदार म्हणून कामकाज करत आहेत. त्यांच्या संस्थेने मौजे शिंदी खुर्द येथे माती बंधारा बांधला आहे. या केलेल्या कामाचे बिलाचा चेक देण्यासाठी वनपाल सुर्यकांत पोळ यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.
बुधवारी (ता. दाेन जून) त्यांनी लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्विकारली. मात्र सापळा रचल्याचे लक्षात येताच स्विकारलेली रक्कम पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात स्थळी फेकून दिली. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. पकडल्यानंतर त्यांच्याकडे व परीसरात लाच रकमेचा शोध घेतला असता लाच रक्कम मिळुन आली नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, संजय साळूंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांच्या पथकाने कारवाई केली.
सेवा समाप्तीला फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना श्री पोळ लाच घेताना सापडल्याने खळबळ माजली आहे.
शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.
समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.