Satara Latest Marathi News 
सातारा

फलटणात खून, दरोडा, घरफोडीतील नऊ गुन्हे उघडकीस; तालुक्यातील चारजण पोलिसांच्या ताब्यात

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहराच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून जबरी चोरी व अन्य गुन्हे घडत होते. त्यापैकी नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात फलटण पोलिसांना यश आले असून, या नऊ गुन्ह्यांमधील दोन लाख 24 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर वस्तू मूळ मालकांना लवकरच परत देण्यात येतील, असे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले. 

या प्रकरणी एका प्रमुख संशयितासह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश रमेश कदम (वय 22, मूळ रा. धुळदेव, ता. फलटण, सध्या रा. ब्राह्मण गल्ली, फलटण) असे अटक केलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे. फलटण हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान, स्वामी विवेकानंद नगर, अनंत मंगल कार्यालय परिसर, महाराजा मंगल कार्यालय या परिसरात अज्ञात मोटार सायकलस्वाराकडून महिला व मुलींच्या हातातील पर्स किंवा गाडीला अडकवलेली बास्केट, पर्स उचलून किंवा जबरदस्तीने हिसकावून नेणे, रस्त्याने मोबाईल फोनवर बोलत जाणाऱ्या महिला किंवा मुली यांच्या हातातील मोबाईल अथवा गळ्यातील मंगळसूत्र किंवा गंठण जबरदस्तीने हिसकावून पोबारा करणे अशा घटना सातत्याने घटत होत्या. साधारणपणे आठवडाभरच्या फरकाने असे प्रकार होत होते. 

फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना संशयिताबाबत माहिती मिळाली. तो पुन्हा याच प्रकारचे गुन्हे करण्यासाठी फलटण शहरात येणार असल्याचे समजले. त्यावरून त्यांनी व त्यांचे सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी महाराजा मंगल कार्यालय येथे सापळा लावून सुरेश रमेश कदम यास एमएच 11 सीएफ 7259 या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून नऊ गुन्ह्यांची कबुली मिळाली.

त्यापैकी तीन जबरी चोरी व सहा चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप, 11 मोबाईल हॅंडसेट, एक मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण दोन लाख चोवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचबरोबर त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हॅंडसेट व लॅपटॉप घेतल्याने आशिष हेमंत अहिवळे, (वय 20 रा. सोमंथळी, ता. फलटण), मयूर संजय साळवे (वय 20), सौरभ संभाजी जाधव (वय 20, दोघे रा. सुरवडी (ता. फलटण) यांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखीन तीन मोबाईल हॅंडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT