सातारा : राज्यात बंदी असलेल्या गुटखा विक्रीसाठी आलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आज साताऱ्यात ताब्यात घेतले. त्याच्याकडून हिरा पान मसाल्याची 26 पोती व रॉयल तंबाखू 717 ची 13 पोती व बोलेरो जीप असा एकूण दहा लाख 52 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अवैध गुटखा विक्रीप्रकरणी सातारा शहरात आठ जणांवर कारवाई करून 24 हजार 703 रूपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांना सातारा शहरातील बुधवार पेठ येथे एक व्यक्ती जीपमधून हिरा गुटख्याची पोती विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित व्यक्तीस सकाळी साडे नऊच्या दरम्यान ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हिरा पान मसाल्याची 26 पोती व रॉयल तंबाखू 717 ची 13 पोती व जीप असा एकूण दहा लाख 52 हजार 060 रूपयांचा मुद्देमाल
हस्तगत केला. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.
त्यांच्याकडून 24 हजार 703 रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला आदींसह कर्मचाऱ्यांनी सहभागी घेतला. या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.