शिरवळ (जि. सातारा) : शिरवळ (shirwal) नजीक पंढरपूर (pandharpur) फाटा येथे एका हॉटेलमध्ये (hotel) बेकादेशीररित्या अंदाजे 13 लाखांचे मेडिकल साहित्य (medical euqipment) साठवणूक केल्याची घटना उघडीस आली. यामध्ये इंजेक्शन (injection) सिरींज व इतर साहित्य आढळून आले. त्या साहित्यावरील एक्सपायरी डेट 2022 अशी आहे. हा साठा रुग्णालय ऐवजी हॉटेलात आढळून आल्याने या घटनेची शिरवळसह खंडाळा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. (satara-crime-news-shirwal-police-seized-medical-euipments-from-hotel)
शिरवळ जवळील पंढरपूर फाटा नजीक एका हॉटेलवर बेकायदेशीररित्या मेडिकलचे साहित्य ठेवण्यात आल्याची माहिती शिरवळ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांना बुधवारी सांयकाळी मिळाली. पोलिस उपनिरीक्षक वैशाली देसाई, सागर अरगडे यांच्यासह कर्मचा-यांसमवेत इंगळे यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका खाेलीत मेडिकल करिता लागणारे साहित्याची साठवणूक केल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
पोलिसांनी संबंधित हॉटेलमधील मेडिकल साहित्य ताब्यात घेतले. त्यानंतर अन्नभेसळ विभागाशी संपर्क साधला. याबाबत पुढील कार्यवाही सुरु असून घटनास्थळाची माहिती पाहणी केली आहे. चुकीच्या प्रकारांना निश्चितीच थारा देणार नाही असे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.