Satara Latest Marathi News 
सातारा

चुलत भावांवर काळाचा घाला; भोर-नीरेला जाणाऱ्या एसटीच्या धडकेत खंडाळ्यातील दोघांचा मृत्यू

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळ-लोणंद रस्त्यावरील फुलोरा सोसायटीजवळ भोर-नीराला जाणारी एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात लोणी (ता. खंडाळा) येथील दोन चुलत भाऊ जागीच ठार झाले असून, एक युवक गंभीर जखमी झाला. 

या अपघातात कृणाल संजय चव्हाण (वय 18) व आदित्य देविदास चव्हाण (वय 14) हे जागीच ठार झाले. ओंकार संजय भोसले (वय 18) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी सांगितले, की शिरवळवरून सकाळी दहा वाजता निघालेली भोर-नीरा ही एसटी बस फुलोरा सोसायटीजवळून जाताना दुभाजक रस्त्यावरून अचानक वन वे होणाऱ्या रस्त्यावर आली असता एसटीला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार (एमएच 11 सीवाय 4836) हा समोरून जात असलेल्या हातगाडीच्या कोपऱ्याला धडकला. त्या वेळी एसटीच्या मागील चाकाखाली हे दोन्ही दुचाकीस्वार आले. या वेळी या युवकांच्या डोक्‍यावरून चाक गेल्याने व गंभीर दुखापत झाल्याने कृणाल चव्हाण व आदित्य चव्हाण हे दोन्ही शाळकरी मुले ठार झाले. 

दुचाकीवर पाठीमागे तिसरा बसलेला युवक हा जखमी झाला. कृणाल हा चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे 11 वीला असल्याने त्यास सोडण्यासाठी ओंकार व आदित्य लोणीवरून शिरवळला जात होते. या वेळी हा अपघात झाला. आदित्य हा शेजारीच असलेल्या भोळी येथील हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. या शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. एसटीचालक अजित तुकाराम गायकवाड (रा. बालवडी, ता. भोर ) यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस वृषाली देसाई करत आहेत. 

लोणी गावावर शोककळा 

देविदास व संजय चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ असून, त्यांची दोन्ही एकुलते एक मुले कृणाल व आदित्य यांचा अपघातात मृत्यू झाल्याने लोणी गावावर मोठी शोककळा पसरली. चव्हाण कुटुंबीयावर आभाळच कोसळले. या दोन्ही सख्या चुलत भावांच्या अंत्यविधीवेळी चव्हाण कुटुंबाने फोडलेला टाहो हृदय हेलवणारा होता. यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT