सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (साेमवार) लाॅकडाऊनच्या अनुषंगाने नव्याने पुन्हा चालू मोहिम बाबत आदेश काढले आहेत. हे आदेश सातारा जिल्ह्यात 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत (24 वाजेपर्यंत) असणार आहेत. यामध्ये ज्या ठिकाणी कोराना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कन्टांनमेंट झोन जाहीर करण्याचे अधिकार इन्सिडंट कमांडन्ट म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. संबंधित कन्टांनमेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सूचित करतील. हा आदेश कन्टांनमेंट झोन वगळता सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी लागू राहील तसेच कन्टांनमेंट झोनबाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडन्ट यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कन्टांनमेंट झोन इनॲक्टीव्ह झाल्यानंतर सदर क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडन्ट तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने कन्टांनमेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील असे म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोगय सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्यावत करणे बंधनकारक राहील. राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुढीलप्रमाणे कोरोना प्रतिबंध उपायोजना करणे सर्वांसाठी बंधनकारक राहील.
दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकात किमान सहा फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास एक हजर दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसासाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास एक हजार दंड आकारण्यात येईल. शहरी भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दाेन हजार रुपये दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसासाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची आहे.
शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅनिग, हँडवॉश, सॅनिटायझर याची एन्ट्री पाँईट व एक्झिट पाँईट वर व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये कामाची पाळी बदलण्याची वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
हे सगळं माझ्याच वाट्याला का, हा विचार बाजूला करुन त्यांनी शाळेचे रुपडेच पालटले
कोळकीत मटक्यासाठी नामांकितांचे पाठबळ ?
'ताे" विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत
मुंबईतील पोलिस कर्मचारी दुचाकीवरुन मूळगावी आले; 15 दिवसानंतर झाले काेराेना बाधित
सातारा शहर पुन्हा कोरोना बाधीत; जिल्ह्यात पाच नवे कंटेनमेंट झोन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.