fund fund
सातारा

सातारा जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी पाच कोटींचा निधी

जिल्ह्यातील सातारा, जावली, कोरगाव व खटाव तालुक्यातील विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : जिल्ह्यातील सातारा, जावली, कोरगाव व खटाव तालुक्यातील विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कोरेगाव व खटाव तालुक्याला दोन कोटी ८६ ला सातारा वजावळी तालुक्यासाठी दोन कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, जिल्हा मार्ग विकास व क वर्ग पर्यटनस्थळ आदी योजनांतून निधी मंजूर आहे.

सातारा तालुक्यातील काशीळ, कोपर्डे, नलवडेवाडी रस्ता. सातारा रेल्वेस्थानक, महागांव, चिंचणेर निगडी रस्ता लिंब, गोवे, वनगळ, आरफळ रस्ता, शिवथर, गोवे, निकमवाडीचा रस्त, कोडोली एमआयडीसी ते जानाई-मळाई पायथा रस्ता आदी रस्त्यासाठी प्रत्येकी १९ लाख ३८ हजारांचा निधी मंजूर आहे. डोळेगांव, पाडळी ते इजिमा रस्त्याला १४ लाखा ७५ हजार भाटमरळी रस्त्याला 16 लाखा मंजूर आहेत. म्हसवे त गटर्स, आरळे येथे स्‍मशानभूमी रस्‍ता, अंगापूर स्‍मशानभूमी रस्‍त्यासाटी प्रत्येकी तीन लाख तर आरे तर्फ परळीत स्‍मशानभूमी शेड, कण्‍हेर अंतर्गत रस्‍ता, क्षेत्रमाहुली रस्ता, उपळी स्‍मशानभूमी रस्‍त्यासाठी प्रत्येकी चार लाख, लिंबतंर्गत रस्‍ता, खडीकरण व डांबरीकरणासह लिंब कोटेश्‍वर मंदीर सुशोभीकरणाला प्रत्येकी पाच लाख तर काशीळ, मांडवे, नागेवाडी व सोनगाव (सं.) निंब येथे शाळा खाोल्यांसाठी प्रत्येकी नऊ लाख मंजूर आहेत.

कोरेगाव तालुक्यातील अंगापूर, रहिमतपूर, अंभेरी रस्ता, धामणेर, सासुर्वे, शिंरबे, एकंबे रस्‍ता आर्वी, पिंपरी, सुर्ली, रस्त्याला प्रत्येकी २५ लाख मंजूर आहेत. शिरंबे, निगडी, अपशिंगे, अंभेरी, आर्वी रस्त्याला १६ लाख, त्रिपुटी, शिरढोण, एकसळ रस्ता, जरेवाडी रस्त्याला प्रत्येकी १९ लाख ६२ हजारांचा निधी मंजूर आहे.

कठापूर, शिरठोण रस्त्याला ३३ लाखा ४१ हजार, कुमठेत जुना रस्त्याला १५ लाख, वडाचीवाडी एकंबे रस्‍त्याला ४५ लाख, कण्‍हेरखेड येथे स्‍मशानभूमीला तीन लाख, वेलंग येथे स्‍मशानभूमी, एकंबे स्‍मशानभूमी, आझादपूर स्‍मशानभूमी प्रत्येकी चार लाख, कुमठेत अंतर्गत रस्ता, वाठार किरोली अंतर्गत रस्ता कोंबडवाडी अंतर्गत रस्त्याला प्रत्येकी चार लाख मंजूर आहेत. खटाव तालुक्‍यात ललगुण रस्त्याला २६ लाख, औंध, गणेशवाडी, कळंबी रस्त्याला २० लाख, पवारवाडी स्‍मशानभूमीत हायमास्‍टला दिड लाख, कातवडी अंतर्गत रस्‍त्याला तीन लाख, पुसेगाव अंतर्गत रस्‍त्याला पाच लाख निधी मंजूर झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT