Vaccine esakal
सातारा

साताऱ्याला मिळाले 79 हजार लशींचे डोस

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात लसीकरणास सुरवात झाल्यापासून सर्वाधिक ७९ हजार लशींचे डोस आज उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम पुन्हा वेग घेणार आहे. जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital), प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) लशींचे वाटप केले असून, लसीकरण मोहीम (Vaccination campaign) पूर्ववत सुरू होणार आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम १६ मार्चपासून सुरू झाली. सुरवातीला लशीचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात ४२ हजारांहून अधिक लसीकरण झाले होते. त्यानंतर लशींचे डोस कमी येण्यास सुरवात झाल्याने मोहीम मंदावली होती. (Satara District Received 79 Thousand Dose Of covaxin And Covishield Vaccine bam92)

केंद्राकडून राज्याला लशीचे डोस जादा प्रमाणात उपलब्ध झाल्याने आज जिल्ह्याला लशीचे डोस मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत.

मात्र, मागील काही दिवसांत लशींची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग येत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सर्वाधिक ५० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध झाली होती. त्यानंतर आज ७९ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये कोव्हिशिल्ड (covishield vaccine) ६९ हजार, तर कोव्हॅक्सिन (covaxin vaccine) १० हजार उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्राकडून राज्याला लशीचे डोस जादा प्रमाणात उपलब्ध झाल्याने आज जिल्ह्याला लशीचे डोस मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. लसीकरणाच्या बाबतीत पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत जास्तीतजास्त लशींची मागणी करणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १२ लाख ३६ हजार लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्याला सर्वाधिक ७९ हजार लस उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम वेग घेणार आहे. येत्या काही दिवसांत जास्तीतजास्त लशीचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-डॉ. प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग

पूरग्रस्तांना जादा डोस मिळणार

गेल्या आठवड्याभरापूर्वी अतिवृष्टीने पूरग्रस्त उघड्यावर पडले आहेत, तसेच या भागात साथीचे आजार पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. याचबरोबर सध्या कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली आहे. यामध्ये पूरग्रस्तांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.

Satara District Received 79 Thousand Dose Of covaxin And Covishield Vaccine bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT