patan 
सातारा

अखेर "त्या' विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : सुमारे 15 दिवसांपूर्वी साईकडे (ता. पाटण) येथे कायदेशीर परवानगी न घेता झालेला विवाह सोहळा आणि त्यात सहभागी नववधूसह वऱ्हाडी मंडळींना झालेली कोरोनाची बाधा या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रशासनाच्या आदेशानुसार येथील पोलिसांनी संबंधितावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. 

साईकडे येथे सात जुलैला झालेल्या विवाह सोहळ्यासाठी जावळी तालुक्‍यातील पुनवडी येथून वेगवेगळ्या मोटारीतून वधू पक्षाकडील वऱ्हाड, तसेच नातेवाईक आलेले होते. मुंबईकर मंडळीसह परिसरातील काही गावांतील नातेवाईक आणि मित्र मंडळीही या वेळी हजर होती. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात दुपारच्या मुहूर्तावर विवाह पार पडल्यानंतर भोजन उरकून वऱ्हाड व पै- पाहुणे आपापल्या गावी निघून गेले. त्यानंतर लग्नाला उपस्थित नातेवाइकांसह पुनवडीतील काही जणांचे कोरोना तपासणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी येऊन धडकल्याने यंत्रणेची एकच धावपळ उडाली. तातडीने नवदांपत्याला तळमावले येथील विलगीकरण कक्षात दाखल करून नववधूचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तपासणीत नववधूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट सहवासीत 13 जणांना विलगीकरण कक्षात, तर अन्य 31 जणांना गावातच होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातीलही आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने साईकडेतही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. 

या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने 16 जुलैला दिलेल्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवशी संबंधितांवर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. पुनवडी येथे काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार उडविला असून, तेथून आलेल्या वऱ्हाडाशी संपर्क आल्याने साईकडेकरांची झोपच उडाली होती. मात्र, साईकडेतील निकट सहवासितांपैकी एकाचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर अन्य सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले. 

(संपादन ः संजय शिंदे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT