Satara news esakal
सातारा

Satara : मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेपाच कोटी ; ‘सारथी’ची कार्यवाही

जिल्ह्यातील पाच हजार ८०७ जणांना मिळाला लाभ

सकाळ डिजिटल टीम

मायणी : सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी जातीच्या जिल्ह्यातील पाच हजार ८०७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पाच कोटी ५७ लाख ४७ हजार २०० रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणारा राज्यातील सातारा हा पहिला जिल्हा ठरला आहे.

मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील किमान उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, शैक्षणिक विकासास हातभार लावणे, त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणे आदी विविध उद्देशाने प्रेरित होऊन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण विकास व प्रशिक्षण मानव विकास (सारथी) संस्था (पुणे) काम करते. संस्थेच्या माध्यमातून इयत्ता आठवीमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विकास (एनएमएमएस) परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यास इयत्ता बारावीपर्यंत प्रतिवर्षी नऊ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती या नावाने शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असते.

त्यासाठी शाळांकडून प्राप्त झालेल्या विहित नमुन्यातील प्रस्तावांची छाननी करण्यात येते. आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करून घ्यावी लागते. मात्र, त्यासाठी ‘सारथी’कडे पुरेसे मनुष्‍यबळ नाही. लवकरात लवकर प्रस्ताव पाठविणे आणि ते शिष्यवृत्ती देण्यासाठी पात्र ठरणे, यासाठी जिल्ह्यात काही शिक्षकांनी स्वतःहून पुढाकार घेत समन्वयक म्हणून कामे केली. त्यासाठी, सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्रातील कार्यकारी अधिकारी (शिक्षण) डॉ. विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयकांनी परिश्रम घेतले. दरम्यान, सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा झाल्याची खातरजमा करून घ्यावी, प्राप्त शिष्यवृत्तीचा उपयोग आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास करण्यासाठीच करावा, असे आवाहन सारथीचे कार्यकारी अधिकारी (शिक्षण) डॉ. पाटील यांनी केले आहे.

राज्यात प्रथम क्रमांकाने सारथी शिष्यवृत्ती वितरणाचा नावलौकिक मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांचे नियोजन व मार्गदर्शन उपयुक्त ठरले. सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयांनी त्यांच्या आदेशांचे तंतोतंत पालन करून सारथी कार्यात आघाडी घेतली. सारथीचे जिल्हा समन्वयक विजयकुमार शिर्के, सर्व तालुका समन्वयक, शाळांचे मुख्याध्यापक या सर्वांनीच मेहनत घेत वेळेत सर्व कामे पूर्ण केली.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मिळवणारा पहिला जिल्हा म्हणून साताऱ्याने राज्यात नावलौकिक मिळविला आहे.

- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, पुणे

शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा मुख्याध्यापक संघ व सारथी तालुका समन्वय यांच्या सहकार्यामुळेच सारथी शिष्यवृत्ती वितरणात राज्यात आघाडी घेऊ शकलो. यापुढेही सर्वांचे सहकार्य मिळेल.

- विजयकुमार शिर्के, सारथी जिल्हा समन्वयक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT