Satara Flood esakal
सातारा

महापुरात विंग-येरवळे-घारेवाडी पाणी योजना जमीनदोस्त

योजनेच्या दुरुस्तीसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी : माजी सरपंच बबनराव शिंदे

विलास खबाले

विंग (सातारा) : विंग-येरवळे परिसरातील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना (Krishna Sugar Factory) पुरस्कृत विंग-येरवळे- घारेवाडी उपसा जलसिंचन योजना (Water System Scheme) अतिवृष्टी आणि महापुरात (Satara Flood) जमीनदोस्त झाली आहे. शासनाने या नुकसानीची तत्काळ दखल घेऊन योजनेच्या दुरुस्तीसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृष्णा कारखान्याचे संचालक व विंगचे माजी सरपंच बबनराव शिंदे यांनी केली आहे.

कोयना आणि वांग नदीच्या (Koyna River) प्रीतिसंगमावर येरवळे येथे ही जलसिंचन योजना १९८५ रोजी सुरू करण्यात आली.

कोयना आणि वांग नदीच्या (Koyna River) प्रीतिसंगमावर येरवळे येथे ही जलसिंचन योजना १९८५ रोजी सुरू करण्यात आली. सुमारे १२०० एकरांहून अधिक क्षेत्र या योजनेतून ओलिताखाली येते. त्यातून विंग परिसरातील पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो. दोन वर्षांपूर्वीपर्यंत याच योजनेतून विंगच्या नळ पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा होत होता. अतिवृष्टीसह कोयना- वांग नद्यांना आलेल्या महापुराचा मोठा फटका या योजनेला बसला. त्यामध्ये विहीर, जॅकवेल गाळाने भरली असून, योजनेच्या मोटारी आणि शेड वाहून गेले आहे. पाइपलाइनचेही मोठे नुकसान झाले आहे.

कारखान्याच्या माध्यमातून ही योजना साकारली असली, तरी आज योजनेचा संचित तोटा काही कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असणाऱ्या या संस्थेला अस्मानी संकटालाही सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता ही योजना लवकरात लवकर दुरुस्त होण्यासाठी शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी श्री. शिंदे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT