कऱ्हाड ः सातारा जिल्ह्यात उद्यापासून (शनिवार) पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चेमुळे शहरात आज (शुक्रवार) नागरिकांनी वाहनात पेट्रोल भरण्यासह दुकानात साहित्य नेण्यासाठी गर्दी केली. मात्र जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनबाबतचा तसा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. काेणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नका असे आवाहन प्रशासनातर्फे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.
शहरासह परिसरात सकाळपासूनच उद्या सातारा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यात दुपारनंतर ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे लोकांनी वाहनात पेट्रोल, डिझेल भरण्यासह किराणा दुकानात साहित्य भरण्यासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर शहरातील रस्त्यावरील गर्दीही वाढली होती. त्यामुळे शहरात वाहतूक वाढली. मात्र लॉकडाऊनबाबत अधिक माहिती मिळत नसल्याने व जिल्ह्यात सर्व अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने लॉकडाऊन होणार असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळाली. त्यातून लोक घराबाहेर पडले. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे लोक
लॉकडाऊनची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करत होते.
दरम्यान, याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यापर्यंत ही अफवा व शहरातील रस्त्यावर झालेल्या गर्दीची माहिती मिळाली. त्यावर तातडीने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचा खुलासा करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना त्याबाबतच्या सूचना केल्या. त्यानुसार प्रांताधिकारी श्री. दीघे यांनी उद्यापासून (शनिवार) लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने अद्याप लॉकडाऊन बाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगून लोकांनी विनाकारण खरेदीसाठी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करू नये. महत्वाच्या कामाशिवाय रस्त्यावर न येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. बाहेर पडणाऱ्या लोकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आदींसह नियमांचे पालन करण्याचेही आवाहन श्री. दीघे यांनी केले आहे.
गृह राज्यमंत्री म्हणतात, पालकमंत्र्यांना काय ठरवायचे ते ठरवू द्या; आपण आपलं बघू
कर्हाड पालिका ठरणार आयडॉल : अंड्याच्या कवचापासून करणार पावडर
Video : जनतेची 'ही' मागणी रास्तच : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.